देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि मुस्लिम विकास विचार मंचातर्फे 'संविधान सन्मान दिवस' उत्साहात साजरा.
२६/११ च्या शहीदांना आदरांजली; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन.
देहूरोड : भारतीय संविधानाचा सन्मान करण्यासाठी आणि लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड व "मुस्लिम विकास विचार मंच" यांच्या संयुक्त विद्यमाने 'संविधान सन्मान दिवस' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वीर जवान आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे स्वरूप - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ॲड.कैलास पानसरे आणि ॲड.नितीन शील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
उद्देशिकेचे वाचन आणि शपथ - कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सामूहिक वाचन. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी संविधानातील मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. सामूहिक वाचनादरम्यान ॲड.नितीन शील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संविधानातील समानता,बंधुता,न्याय आणि स्वातंत्र्य या चारही स्तंभांचे महत्त्व आणि आजच्या काळातील त्यांची गरज पटवून दिली.
संविधान शिलाकोन पूजन - कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आवारातील 'संविधान शिलाकोन' येथे मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रज्जाक शेख आणि नवयुग निर्माण समितीचे संस्थापक अध्यक्ष आलमगीर कुरेशी यांच्या हस्ते शिलाकोनास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
उपस्थित मान्यवर - या कार्यक्रमास देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी,कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये के. एच.सूर्यवंशी, हुसेन शेख,बंदेअली सय्यद,जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे,अन्वर शेख,सचिन जोगदंड,शाहिद शेख, प्रकाश मासेकर,नितीन सोनावणे आणि प्रकाश कांबळे यांचा समावेश होता.
