Ticker

6/recent/ticker-posts

धनंजय मुंढेच्या प्रतिमेला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारून केला निषेध



सोलापूर : माजी मंत्री धनंजय मुंढे यांच्यावर मनोज जरांगे यांनी आरोप केला आहे. माझ्या हत्येचा कट धनंजय मुंढे यांच्या सांगण्यावरून केला होता असा आरोप स्वतः मनोज जरांगे यांनी केला आहे.बीड पोलिसांनी दोन संशयीत आरोपींना अटक केले आहे. या घटनेनंतर राज्यातील मराठा बांधव संतप्त झाले आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनंजय मुंढेच्या बॅनरला जोडे मारून निषेध केला. सकल मराठा समाजाचे माऊली पवार,महेश पवार,आबा सावंत, प्रशांत देशमुख,सचिन तिकटे,अरविंद गवळी,चंद्रकांत पात्रे,शिवाजी चापले,महेश पवार,दिनेश जाधव,सचिन गुंड,सुनील माने आदी उपस्थित होते.




मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लेस सुरक्षा द्या - माऊली पवार - मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाचा कट रचण्यात आला होता. याचा मूळ सूत्रधार धनंजय मुंडे आहे म्हणून त्यांच्या पोस्टरला जोडे मारत आहोत अशी प्रतिक्रिया माऊली पवार यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रस्त्यावर ठिय्या मांडत निदर्शने करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लेस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाजाचे सोलापूरचे समन्वयक माऊली पवार यांनी आंदोलनावेळी केली. धनंजय मुंडे यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. पूर्ण कटात सामील असणाऱ्या लोकांना शासन झाले पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांची काळजी जर महाराष्ट्र सरकारने नाही घेतली तर मराठे महाराष्ट्र बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही. असा इशारा आंदोलन वेळी पवार यांनी दिला.