सोलापूर : कोंडी,जिल्हा युवक संचालनालय विभाग पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय स्पर्धा योग्य नियोजनात पार पडल्या.
या स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर व विजयसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांगीक आणि वैयक्तिक या दोन्हीही प्रकारामध्ये घवघवीत यश मिळवून आकाशाला गवसणी घातली.
14 वर्षे वयोगटांमध्ये लांब उडी मध्ये वैयक्तिक स्पर्धेमध्ये शिवांजली समाधान साठे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर रवी राठोड याने तिसरा क्रमांक प्राप्त केला.
सतरा वर्षे वयोगटांमध्ये अक्षरा दिनकर साठे हिने प्रथम क्रमांक मिळविला. राजवीर विठ्ठल भोसले याने प्रथम क्रमांक पटकाविला तर 19 वर्ष वयोगटांमध्ये समीक्षा कानिफनाथ शिरसागर प्रथम क्रमांक मिळविला तर दिव्या दत्तात्रय गुंड हिने द्वितीय क्रमांक तर सिद्धी सोमनाथ घडमोडे तिने तृतीय तर मुलांमध्ये अजिंक्य वाघमोडे आणि विश्वजीत भोसले यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला.
सांघिक मध्ये विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयाने यशाचे शिखर प्राप्त केले. 19 वर्ष वयोगटामध्ये मुलींमध्ये क्रिकेट सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर मुलांनी कबड्डी आणि क्रिकेटमध्ये उपविजेतेपद मिळवले. जिजाऊ ज्ञान मंदिर 17 वर्षे वयोगटात क्रिकेटमध्ये मुलींनी उपविजेतेपद मिळवले.
अशाप्रकारे जिजाऊ ज्ञान मंदिर च्या विद्यार्थ्यांनी अतिशय नेत्र दीपक आणि नयनरम्य यश मिळवत जिल्ह्यामध्ये आपले आणि आपल्या शाळेचे नाव रोशन केले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ प्राचार्य सुषमा निळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सत्कार केला आहे. क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.