Ticker

6/recent/ticker-posts

“स्वच्छ व सुंदर सोलापूर” या मोहिमेअंतर्गत शहरातील...

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार व तैमूर मुलाणी, उपायुक्त यांचे मार्गदर्शनाखाली “स्वच्छ व सुंदर सोलापूर” या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी स्वच्छतेची व सौंदर्यीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. उद्यान विभागामार्फत मैदान,चौक,मुख्य रस्त्यांवरील दुभाजक तसेच फुटपाथ परिसरातील वाढलेले गवत, काटेरी झुडपे यांची कात्रण करून परिसर स्वच्छ करण्याचे तसेच सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.



या मोहिमे अंतर्गत पूर्ण व सुरू असलेली सात रस्ता येथील नाना नानी पार्क या ठिकाणी स्वतः आयुक्त यांनी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी नाना नानी पार्क मधील गवत काढणे,वाढलेली झाडें काढणे,पार्क परिसर स्वच्छता करणे. तसेच फुटपाथ परिसर-स्वच्छता करून नागरिकांना चालण्यासाठी अडथळा निर्माण करणारे काटेरी झुडपे काढण्यात यावे. मैदान व चौकांमध्येही टप्प्याटप्प्याने स्वच्छता मोहिम घेण्यात यावे अश्या सूचना आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले. 




यावेळी उपायुक्त तैमूर मुलाणी,सहायक आयुक्त शशिकांत भोसले,अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपण डंके,मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी,उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर उपस्थित होते.