Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाही दिनात १७ शासकीय कार्यालयाकडे ३० तक्रार अर्ज प्राप्त

 
सोलापूर : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आजच्या लोकशाही दिनात जिल्ह्यातील १७ शासकीय कार्यालयात च्या ३० तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयानी तात्काळ या तक्रारींचा निपटारा करावा. तसेच तक्रार करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांशी सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली वर्तणूक ठेवावी असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिले.

लोकशाही दिनात संबंधित शासकीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी पुढील प्रमाणे - जिल्हा परिषद सोलापूर - , पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण - १, पोलीस आयुक्त सोलापूर शहर - ३, जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख कार्यालय सोलापूर - ३, कामगार आयुक्त - १,  सार्वजनिक बांधकाम विभाग - २, तहसिलदार महसूल शाखा - ५, तहसिलदार बार्शी - १, तहसिलदार करमाळा - १, महावितरण सोलापूर - १,  तहसिलदार मोहोळ - २, दुय्यम चिटणीस गृह शाखा - १, उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय - २, तहसिलदार उत्तर सोलापूर - १, कार्यकारी अभियंता,महावितरण – २, सहा. आयुक्त नगरपालिका प्रशासन - १, अशा एकुण ३० तक्रारी अर्ज जिल्हा लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या आहेत.