Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटने कडून पूरग्रस्तांना मदत


सोलापूर : आपत्कालीन परिस्थितीत,शासनामार्फत आपत्कालीन व्यवस्थापनांतर्गत शासकीय डॉक्टर वैद्यकीय शिबिरात काम करतातच व व ते त्यांचे कर्तव्यच असत. परंतु सोलापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वस्व गमावलेल्या पूरग्रस्तांना शासकीय डॉक्टरांच्या संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे. डॉ.वै.स्मृ.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथील वैद्यकीय अध्यापकांच्या महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संघटना या संघटनेने पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. 



तिर्हे,वांगी येथील पूरग्रस्तांना दि. २ व ३ ऑक्टोंबर रोजी जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. किटमध्ये ब्लॅंकेट,चादर,बेडशीट,बिस्किट,पाणी बॉटल तसेच ताट वाटी तांब्या फुलपात्र ग्लास पातेलं चमचा भातवाडी अशा संसार उपयोगी भांड्यांचा सेट देण्यात आला. एकूण १२० कुटुंबीयांना या कीटचे वाटप करण्यात आले. 




महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना सोलापूर शाखेच्या डॉ.सरोज बोलदे, डॉ.औदुंबर मस्के,डॉ.संजय फुलारी,डॉ.गजानन जत्ती,डॉ.शुक्लधन रोडे,डॉ.संचित खरे,डॉ.विजयकुमार झाड,डॉ.लगदीर गायकवाड,वसीम बेन्नीशिरूर व पदवी पूर्व विद्यार्थी यांनी व्यक्तिशः जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.



महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संघटनेचे अध्यक्ष,डॉ. औदुंबर मस्के,सचिव डॉ.सुनील हंद्राळमठ,उपाध्यक्ष डॉ. सचिन बंदीछोडे व खजिनदार डॉ.गजानन जत्ती यांनी मदत गोळा करण्यासाठी परिश्रम घेतले. अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, उपाधिष्ठाता डॉ.विद्या तिरणकर,डॉ. नरेंद्र झंजाड व डॉ.चंद्रकांत वाघमारे यांनी सहकार्य केले.