"केतन शहा यांचा सोलापूर गुजराती मित्र मंडळ तर्फे सन्मान"
सोलापूर : सोलापूर गुजराती मित्र मंडळ तर्फे केतन शहा यांचा मागील वर्षी भारतीय जैन संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदी व कौटुंबिक न्यायालया च्या जिल्हा अध्यक्षपदी, तसेच राज्य शासना तर्फे प्राणी कल्याण मंडळ,प्राणी क्लेश प्रतीबांधित समिती,महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स मुंबई च्या सिव्हिल एव्हिएशन समितीच्या को-चेअरमन पदी व अश्या विविध संस्था व संघटने पदी निवड व नेमणूक झाल्याबद्दल तसेच पूरग्रस्त भागात जाऊन धान्याचे किट व मुक्या जनावरा साठी चारा देण्याची सेवा दिल्या बद्दल,त्याच प्रमाणे सोलापूर जिल्ह्याच्या विकासा साठी महत्वाची ही विमानसेवा सुरू करण्याबाबत मागील ०५ वर्षा पासून सर्वांना सोबत घेऊन जे प्रयत्न व आंदोलने केली तसेव बंदुकीच्या धमकीला देखील न घाबरता व कोणत्याही राजकीय पक्षांचा पाठिंबा नसताना देखील विमानसेवा ही सुरू करून दाखविल्या बद्दल विशेष सन्मानचिन्ह देऊन समाजाचे अध्यक्ष मुकेश मेहता यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ह्या वेळी व्यासपीठावर गुजराती समाजाचे उपाध्यक्ष मणीकांत दंड,सचिव जयेश पटेल,सह सचिव संदीप जव्हेरी,खजिनदार चिमन पटेल हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ,राजीव मोहोळकर यांच्या जुन्या गाण्याच्या संगीत संध्यानी झाली. ह्या वर्षाभिनदंनं कार्यक्रमात ३५० पेक्षा जास्त गुजराती समाज सदस्य व बंधू भगिनी उपस्थित होते. विशेष केतन शहा यांचे वडील स्व.महेंद्र शहा यांनी ह्या संस्थे मध्ये विविध पदावर ५४ वर्षे सेवा दिली आहे.
