सोलापूर : धारदार चाकू वापरून खुनाचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोपाखाली अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गु.र.क्रमांक ०४४९/२०२५,दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११८(१), ३५२ व ३५१(३) प्रमाणे आरोपी रामचंद्र चंद्रकांत पुजारी,रा.मैंदर्गी,ता.अक्कलकोट,जि. सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर प्रकरणात फिर्यादी चिदानंद शिवचलप्पा पुजारी, वय २७ वर्षे,रा.मैंदर्गी,ता.अक्कलकोट,सोलापूर,यांनी दिलेल्या जबाबानुसार, दि.२७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास आरोपी रामचंद्र पुजारी यांनी पूर्ववैमनस्यातून फिर्यादीस “तु माझ्या मुलीला का वारंवार त्रास देतोस,आज तुला खल्लास करतो” असे म्हणत आरोपीकडे असलेल्या धारदार चाकूने फिर्यादीस त्याच्या मानेवर आणि हातावर तसेच पोटाच्या डाव्या बाजूला चाकूचे वार करू गंभीर जखमी केले होते.तसेच यातील फिर्यादीने स्वतःच्या जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना देखील आरोपीने त्याचा पाठलाग केला होता.तदनंतर फिर्यादीस उपचाराकरिता तत्काळ सिव्हील हॉस्पिटल,सोलापूर येथे दाखल करण्यात आले होते.
सदर घटनेतील आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे आपला जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश अ.राणे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे.
या प्रकरणात - आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे,ॲड.रोहीत थोरात,ॲड.पैगंबर सय्यद,ॲड.ओंकार फडतरे,ॲड. मोहीम पठाण,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मनिष बाबरे,ॲड. शिवानी पवार,ॲड.अजय वाघमारे,ॲड.अभिषेक नागटिळक आणि ॲड.त्वरिता वाघ यांनी काम पाहिले तर फिर्यादीतर्फे - ॲड.विक्रांत फताटे आणि - सरकारतर्फे ॲड.डोके यांनी काम पाहिले.
