नई जिंदगी कब्रस्तान विकासाचा मार्ग मोकळा;
अजहर शेख (AIMIM) यांच्या प्रयत्नांना यश!
सोलापूर : सोलापूर शहरातील नई जिंदगी येथील ‘नई जिंदगी मुस्लिम कब्रस्तान’ च्या विकासासाठी एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. AIMIM पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते अजहर शेख यांच्या अथक प्रयत्नांमुळे या चार एकर जमिनीच्या उताऱ्यावर आज वक्फ बोर्डाचे नाव अधिकृतरित्या नोंदवण्यात येत आहे.
मागील काही वर्षांपासून या कब्रस्तानच्या उताऱ्यावर वक्फ बोर्डाचे नाव नसल्यामुळे,शासनाकडून किंवा इतर माध्यमातून विकासासाठी निधी मिळवण्यात मोठा अडथळा निर्माण होत होता. कायदेशीर कागदपत्रांमध्ये ही त्रुटी असल्यामुळे विकासकामांना खीळ बसली होती. AIMIM पक्षाच्या आणि अजहर शेख यांच्या पाठपुराव्यामुळे आज अखेर ही महत्त्वपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत आहे. यामुळे भविष्यात या कब्रस्तानच्या विकासासाठी सरकारी किंवा वक्फ बोर्डाचा निधी मिळवण्यातील सर्व अडथळे आता दूर होणार आहेत.
