Ticker

6/recent/ticker-posts

अशासकीय माळी पदाची भरती...

सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे अशासकीय माळी पदाची भरती

सोलापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सोलापूर यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे अशासकीय माळी पद - 01 भरावयाचे आहे. माळी पदाचा अनुभव असणा-यास प्राधान्य देण्यात येईल. मानधन रुपये रु.13 हजार 89 प्रतिमहा असेल. सदर पद हे माजी सैनिक प्रवर्गातून भरावयाची असून सोलापूर जिल्हयातील माजी सैनिक यांनी आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पूर्वी या कार्यालयात जमा करावी. 





दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी मुलाखती घेण्यात येतील - उमेदवारांनी स्वतःची मुळ कागदपत्रे सोबत आणावीत. सदर पद भरतीसाठी युध्द विधवा,माजी सैनिकाची विधवा पत्नी व माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल. माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील उमेदवारांचा विचार केला जाईल. तरी सोलापूर जिल्यातील पात्र व गरजू युध्द विधवा किंवा माजी सैनिकाची विधवा पत्नी व माजी सैनिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे,आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,मेजर मिलिंद देवदत्त तुंगार यांनी केले आहे.