Ticker

6/recent/ticker-posts

इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन च्या वतीने व्याख्यान संपन्न


सोलापूर : सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन च्या वतीने संजय कुलकर्णी (GST सल्लागार) यांचे GST - कर परतावा भरताना घ्यावयाची काळजी या विषयावर सर्व सभासदांसाठी सेडा हॉल येथे माहितीपूर्ण व्याख्यान शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी अल्पोपहारनंतर आयोजित करण्यात आले. 



GST रिटर्न दाखल करताना व त्यानंतर घ्यायची काळजी,रिटर्न दाखल केल्यानंतर घ्यायची काळजी यावर संजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करून सभासदांच्या शंकांना समर्पक उत्तरे दिली. 




या व्याख्यानास अध्यक्ष डॉ.सुरजरतन धूत,माजी अध्यक्ष आनंद येमुल,माजी संचालक राजेश जाजू,गणेश सूत्रावे सेडा चे संस्थापक अध्यक्ष केतन शाह,संचालक सर्वश्री गिरीश मुंदडा,सुयोग कालानी,रवींद्र पाचलग,सुनील भांजे व इतर अनेक सभासद बंधू बहुसंख्येने उपस्थित होती. सोबतच सोलापूर व्यापारी संघटना व नॉर्थ इंडस्ट्रीयल असोसिएशन चे पदाधिकारी व सभासद ही उपस्थित होते.