सोलापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदार नोंदणीची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2025 आहे. या तारखेपूर्वी दोन्ही मतदार संघांकरिता पात्र व्यक्तींनी अर्ज करावेत असे अवाहन पदनिर्देशित अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागाच्या पदवीधर व शिक्षक मतदार संध्याच्या निवडणूकांकरिता 01 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यासाठी सोलापूर शहरामध्ये पदवीधर मतदार संघाकरिता 24 मतदान केंद्रे आणि शिक्षक मतदार संघाकरिता 5 मतदान केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. पदवीधर मतदार संघाकरिता फॉर्म नंबर 18 तर शिक्षक मतदार संघाकरिता फॉर्म 19 भरून द्यावयाचे आहे. नियुक्त करण्यांत आलेले पदनिर्देशित अधिकारी व त्यांचे कार्यक्षेत्र खालील प्रमाणे आहेत.
निलेश पाटील मोबाईल नंबर 9623458715, तहसीलदार उत्तर सोलापूर अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी श्री विठ्ठल जाधव मोबाईल नंबर 7620526232 मतदान क्षेत्राचे नाव-तिऱ्हे शेळगी.
तहसीलदार कुळ फायदा- सैपन नदाफ मोबा.नंबर 8379981799, अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी सुधाकर बंडगर मोबा.नंबर 9881741311. मतदान क्षेत्राचे नाव सोरेगाव मजरेवाडी.
तहसीलदार सं. गा.यो-शिल्पा पाटील मो.नंबर 9623458710 अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी, चंद्रकांत हेडगिरे,मो.नंबर 9423035406 मतदान क्षेत्राचे नाव- कोंडी,बाळे.
गट विकास अधिकारी,पं.समि.उत्तर सोलापूर, राजाराम भोंग मोबा.नंबर 8668429127 ,अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी, बाबासाहेब चंद्रकांत पाटील मोबाईल नंबर 9960187375 मतदान क्षेत्राचे नाव- वडाळा मार्डी.
सहाय्यक आयुक्त सोमपा. सोलापूर गिरीश पंडित मोबा.नंबर 8237678836, अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी रियाज कुरणे मो.नंबर 9881899292,मतदान क्षेत्राचे नाव कसबे सोलापूर शहर. - सहाय्यक आयुक्त सो.म.पा.मनीषा मगर मोबा.नंबर 9730948930 अतिरिक्त पद निर्देशित अधिकारी रियाज कुरणे,मो.नंबर 9881899292 , मतदान क्षेत्राचे नाव कसबे सोलापूर शहर. तरी पात्र मतदारांनी मतदार नोंदणीच्या कामासाठी वर नमूद केलेल्या महसुली मंडळा नुसार अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1 यांनी केले आहे.
मतदार नोंदणी कार्यक्रमाचे टप्पे - सूचना प्रसिद्धी- (मतदार नोंदणी अधिनियम, 1960 च्या कलम 31 (3) नुसार जाहीर सूचना दि. 30 सप्टें 2025 (मंगळवार) रोजी प्रसिद्ध केली जाईल.
वर्तमानपत्रातील नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी - दि 15 ऑक्टोबर 2025 (बुधबार) रोजी वर्तमान पत्रात नोटीस पुन्हा प्रसिद्ध केली जाईल.
वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुनर्प्रसिद्धी - दि. 25 ऑक्टोबर 2025 (शनिवार) रोजी नोटीसीची दुसरी पुनर्प्रसिद्धी केली जाईल.
दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांकः -प्रकरणानुसार नमुना 18 किवा 19 द्वारे दावे आणि हरकती स्वीकारण्याचा अंतिम दि.06 नोव्हेंबर 2025 (गुरुवार) आहे.
हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई:- दि. 20 नोव्हेंबर 2025 (गुरुवार) पर्यंत हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारूप मतदार याद्याची छपाई करणे अपेक्षित आहे.
प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी- प्रारूप मतदार याद्या दि. 25 नोव्हेंबर 2025 (मंगळवार) रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी:- मतदार नोंदणी अधिनियम, 1960 च्या कलम 12 अंतर्गत दावे व हरकती दि. 25 नोव्हेंबर 2025 (मंगळवार) ते दि. 10 डिसेंबर 2025 (बुधवार) या कालावधीत स्वीकारल्या जातील.
दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करणे:- दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करणे आणि तिची छपाई दि. 25 डिसेंबर 2025 (गुरुवार) पर्यंत केली जाईल.
मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी: मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दि 30 डिसेंबर 2025 (मंगळवार) रोजी होईल.
पात्र मतदारांनी जास्तीत जास्त फॉर्म भरून आपले नांव नोंदवावे. असे अवाहन मतदार यांना करण्यात येत आहे. https://mahaelection.gov.in वेबसाईटवर पदवीधर नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच दोन्ही मतदार संघासाठी ऑफलाईन फॉर्म तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर येथील निवडणूक शाखेत उपलब्ध करणेत आले आहे.
अशी माहिती पदनिर्देशित अधिकारी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ तथा तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली.
