Ticker

6/recent/ticker-posts

सीना नदी परिसरातील पूरग्रस्त गावांची स्थिती व मागण्या

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी परिसरातील पूरग्रस्त गावांची स्थिती व मागण्या

सोलापूर : NAPM, महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक ३ व ४ ऑक्टोबर २०२५ रोजी NAPMच्या राष्ट्रीय समन्वयक सुनिती सु र, राज्य समन्वयक सुजय मोरे,मनीष देशपांडे, अजिंक्य गायकवाड,वैभवी प्रेमलता संजय व अन्य कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील काही निवडक पूरग्रस्त भागांची पाहणी केली. केवल फडतरे,सुषमा, दीपक बनसोडे यांच्या सहकार्याने ही पाहणी पार पडली व उद्या धाराशिव जिल्ह्यातील पूर बाधित क्षेत्रांच्या पाहणीसाठी पुढील प्रवास करीत आहोत.



या दौऱ्यात संकलित केलेले साहित्य - उदा. कपडे, भांडी,अन्नधान्य इत्यादी - अत्यंत गरजू आणि ज्यांपर्यंत अद्याप कोणतीही मदत पोहोचलेली नव्हती अशा कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात आले. स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मदतीने पूरग्रस्त क्षेत्रातील वास्तविक परिस्थितीची सखोल माहिती घेण्यात आली. अनेक ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले असून, शेतजमिनींवर गाळ साचल्यामुळे शेतीची पुनर्रचना कठीण झाली आहे.



पूरग्रस्त नागरिकांनी शासनाकडून झालेल्या अपुऱ्या मदतीबाबत तसेच पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या सर्व परिस्थितीची पाहणी करीत पूरपीडितांच्या मागण्या व प्रत्यक्ष परिस्थितीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आणि त्यावर राज्य तसेच केंद्र शासनाकडे ठोस पाठपुरावा करण्याचे ठरवले.

१) भीमनगर, शिंगोली
• लोकसंख्या : सुमारे १,७००.

• स्थिती - १) नव्या पुलाला पाणी तटल,पुलाच्या भिंतीमुळे शिंगोली गाव धरणात असल्यासारखी स्थिती. २) प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने मोठे नुकसान.
३) २७५ घरांपैकी १८० घरांत पाणी घुसले, २० घरे पूर्णत : पाण्याखाली. ४) शाळा : ३ ५) परिणाम : भांडी,कपडे,दैनंदिन वापराच्या वस्तू नष्ट. ६) खरीफ व रब्बी दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान. ७) शेतकरी कर्जबाजारी; शेतमजूर पिकावर अवलंबून असल्याने रोजगार कोसळला.

मागण्या - १)  तात्काळ नुकसानभरपाई व शेतकऱ्यांना १ ते १.५ लाख मदत. २) पिकांच्या पंचनाम्यानंतर शेतकरी व मजुरांना भत्ता. ३) बचत गटांचे हप्ते रद्द करणे. ४) शेतमजुरांचा रोजगार बंद झाल्याने त्यांच्या रोजगारासाठी पर्याय उभा करावा. ५) तात्पुरते रोजगार हमी कार्यक्रम सुरू करणे. ६) पुनर्वसनासाठी २ किमी अंतरावर जागा उपलब्ध करून देणे.

२) मनगोळी 
• लोकसंख्या : सुमारे २७० कुटुंबे पूरग्रस्त.
• स्थिती :     
 - अनेक घरांचे पत्रे वाहून गेले      
- अनेक घरात ओल असलेने घरात राहण्यासारखं परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही
- तसेच कांदा व ऊस पिक नष्ट.
- अजून पंचनामा नाही; सरकारी मदत मिळालेली नाही.
- समाजरचना :         
- अनुसूचित जाति : २५% (म्हार, मांग, चांभार)       
 - ओपन (मराठा) : ४०% मुस्लिम : २५% व इतर १०%
- गावात जातीय भेदभाव नाही, मात्र राजकीय गट आहेत.
- संस्था संघटना यांचेवतीने खाजगी पातळीवर अन्नकिट व जीवनावश्यक साहित्य वाटप केले.



- अजूनही घरे स्वच्छ नाहीत; २०० पेक्षा जास्त लोक संकटात.
• मागण्या :
1. तातडीने पंचनामा व अधिकृत यादी.
2. पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य व वस्त्र मदत.
3. रोजगार उपलब्ध करून देणे.
4. गावात स्वच्छता मोहिम राबवावी.       
5. शेतकऱ्यांच्या पिकांची योग्य त्या दरात नुकसान भरपाई द्यावी       
6. शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवावा 

३) वांगी शिवार -
• लोकसंख्या : ८ ते १० कुटुंब 
• स्थिती :
- येथील सर्वच कुटुंबांस अजूनही काहीच मदत नाही.
- घरांची अवस्था अद्यापही नीट नसलेने ही सर्व कुटुंब रस्त्यालगतच पाले करून राहतात.
- गावातील सर्व कुटुंबे शेती व रोजंदारीवर अवलंबून.
- ऊस पूर्णतः नष्ट.
- विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत.
• मागण्या :
1. तातडीने सर्व बाधित कुटुंबांचा पंचनामा व मदत.
2. शेती व शेतमजुरांसाठी रोजगार हमी योजना सुरू करणे.
3. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फी माफी व तात्पुरती शाळा व्यवस्था.



४) वांगी -
• लोकसंख्या : सुमारे ५५० कुटुंबे; ४०० बाधित.
• स्थिती :
- १५-२० कुटुंबांना अजूनही काहीच मदत नाही.
- गावातील सर्व कुटुंबे शेती व रोजंदारीवर अवलंबून.
- ऊस पूर्णतः नष्ट.
- विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत.
• मागण्या :
1. तातडीने सर्व बाधित कुटुंबांचा पंचनामा व मदत.
2. शेती व शेतमजुरांसाठी रोजगार हमी योजना सुरू करणे.
3. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फी माफी व तात्पुरती शाळा व्यवस्था.

सर्व गावांची एकत्रित मागणी:
• हवामान बदल व पूरस्थिती लक्षात घेऊन स्थायी उपाययोजना (बंधारे,नदी खोलीकरण, पाणी व्यवस्थापन).
• तातडीची मदत : अन्नधान्य, कपडे, स्वच्छता, रोग प्रतिबंधक उपाययोजना 
• दीर्घकालीन मदत :
- शेतकरी व शेतमजुरांना रोजगार हमी.
- शैक्षणिक साहित्य,शाळांची स्वच्छता व शाळांची पुनर्बांधणी.
- कर्जमाफी व बचत गट हप्ते रद्द.
- पुनर्वसनासाठी जागा व घरे.