Ticker

6/recent/ticker-posts

पुराचे पाणी गेलेल्या उसाची काळजी...


...डॉ. लालासाहेब तांबडे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख,
 कृषी विज्ञान केंद्र सोलापूर
lrtambade@gmail.com

पुरामुळे ऊस पाण्याखाली राहिल्यास त्यावर प्रतिकूल परिणाम होतो. योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनाचे नुकसान परिस्थितीनिहाय काही प्रमाणात कमी करता येते.



तात्काळ उपाय -  १) पाणी काढून टाका : शेतातले पाणी लवकरात लवकर निचरा करावा/ लहान सर काढून. जर जास्त वेळ पाणी उभे राहिल्यास मुळांचा श्वसनप्रक्रियेवर / अन्नद्रव्य घेण्यावर विपरीत परिणाम होतो.

२)  माती हलकी करणे : निचऱ्यानंतर मातीत हवेचा प्रवेश होण्यासाठी आंतरमशागत करावी. लहान प्रमाणात रान बांधणी/कोळपणी करून मुळांना श्वसनास मदत होते, तसेच वापसा परिस्थिती निर्माण होते.

३)  सुकत चाललेली/ पिवळी पडलेली पाने काढून टाका : पिवळसर व कुजलेली पाने काढून टाकल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

रोग व कीड नियंत्रण - १)  बुरशीजन्य रोग (कुज रोग,लाल कुज,मूळ कुज): 2.5 ग्रॅम ट्रायकोडर्मा + 2.5 ग्रॅम प्स्यूडोमोनास प्रति लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ फवारणी / आळवणी करावी.

२) किडींचा प्रादुर्भाव - पाणी कमी झाल्यावर पाचट  कुजते, त्यात पांढरी माशी,तुडतुडे,मावा वाढतो. त्यासाठी थायोमेथॉक्साम 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे औषधाची फवारणी करावी.




वाढ पुनर्संचयित करण्यासाठी - १) सेंद्रिय द्रव्य पुरवठा: जीवामृत / सेंद्रिय खत / गांडूळखत टाकावे.

२) सुपीकता व्यवस्थापन: झाडांचे तात्काळ पोषण होण्यासाठी 2% युरिया + 2% मुरेट ऑफ पोटॅश पानावर फवारावे.

३)  मातीतील जीवजंतू पुनर्संचयित करणे : ट्रायकोडर्मा,अझोटोबॅक्टर,पीएसबी,बायोमिक्स अशा जैविक खतांचा वापर करावा.

ऊस पिकामध्ये चांगला वापसा आल्यानंतर पिकाच्या अवस्थेप्रमाणे जमिनीची बांधणी करून उर्वरित खतांचा बेसल डोस टाकावा. वरील प्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस प