सोलापूर : प्रधानमंत्री यशस्वी (PM-YASASVI) योजनेअंतर्गत इ. 10 वी ते इ. 12 वी मध्ये शिकणाऱ्या सोलापूर जिल्हृातील इतर मागास प्रवर्ग,आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्ग व विमुक्त जाति भटक्या जमातींच्या विद्यार्थ्यांना टॉप क्लास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्ग शिष्यवृत्ती मिळणेकरीता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज https://scholarships.gov.in/ या नॅशलन स्कॉलरशिप संकेतस्थळावर सादर करावेत.
या संदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी या कार्यालयाशी व संबंधीत गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधून दि.15 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज भरुन घ्यावेत,असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहायक संचाल गणेश सोनटक्के यांनी केले आहे.
