शाश्वत भविष्यासाठी सायकलिंग यावर्षीची संकल्पना
सोलापूर : भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन, आणि सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.३० वाजता महापालिकेच्या आवारातून सायकल रॅली सुरु होणार असून मार्ग पुढीलप्रमाणे सोलापूर महापालिका,पार्क चौक,सरस्वती चौक,शिवाजी महाराज चौक,एकेरी वळण,नवी पेठेत प्रवेश,लकी चौक,हुतात्मा बागीचा रस्ता, पार्क चौक,डफरीन चौक वळण आणि सोलापूर महापालिका आवर येथे समारोप होणार आहे,अशी माहिती उपायुक्त किरणकुमार मोरे आणि सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी दिली आहे.
सायकल चालवल्याने निरोगी जीवनशैली आणि पर्यावरणाची काळजी घेण्यास सहायता होत असल्याने दरवर्षी 3 जून रोजी जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. जास्तीत जास्त साइकल प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त मनिषा मगर आणि मनपा पर्यावरण विभागाचे अक्षय मोरे यांनी केले आहे.