Ticker

6/recent/ticker-posts

सैफुल चौक ते बॉम्बे पार्क दरम्यान रोडवर स्पीड ब्रेकर...


सोलापूर : प्रभाग क्रमांक २६ मधील सैफुल चौक ते बॉम्बे पार्क दरम्यान रोडवर स्पीड ब्रेकर नव्हते त्यामुळे वाहने भरधाव वेगाने जात येत होती त्यामुळे अनेक अपघात घडले होते. याबाबत नगरातील नागरिक यांनी ही बाब माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना निदर्शनास आणून दिली होती. नागरिकांनी सदर रोडवर स्पीड ब्रेकर बसवावे म्हणून माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना विनंती केल्याने तात्काळ सोलापूर महानगरपालिका नगर अभियंता कार्यालयास निवेदन देऊन तात्काळ सदर रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे असे निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन तात्काळ स्पीड ब्रेकर बनवण्यात आले व त्यावर झेब्रा क्रॉसचे पट्टे रंगरंगोटी करण्यात आली त्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना स्पीड ब्रेकर असले बाबत अंदाज येत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाल्याने सदर रस्त्यावरून जाणारे येणारे नागरिक यांनी माजी नगरसेविका चव्हाण यांना समक्ष भेटून वरील समस्या दूर केल्याबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले.