Ticker

6/recent/ticker-posts

बापरे......शहर आरोग्य अधिकाऱ्याच आरोपी डॉ. राखी माने असा उल्लेख


आरोग्य मंत्री साहेब वाचवा....नरडीचा घोट घेणार म्हणे

उपसंचालक डॉ.राधाकिशन पवारांनी डोक्यावर घेतलं म्हणून धिंगाणा सुरुय

बापरे........बाप आजपर्यंत कधीच सोलापूर शहर आरोग्य अधिकाऱ्यांच नाव आरोपी म्हणून आलं नव्हतं.परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे नाव सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये आरोपी डॉ. राखी माने असा उल्लेख केला आहे. जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्यास ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी तुझ्या नरडीचा घोट घेतो,अशी दमदाटी करत त्याच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. डॉ.राखी माने सोबत विजयमाला बेले यांचा सुद्धा आरोपी म्हणून उल्लेख केला आहे.

आरोग्य खात्याचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवारांनी दोघा डॉक्टर पती-पत्नीला डोक्यावर घेतले म्हणून जिल्हा रुग्णालयात मनमानी कारभार सुरू आहे. आगीचा वणवा फक्त सोलापूरपुरता मर्यादित राहणार नाही तर याचे चटके पुण्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना बसणार आहेत. आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर यांना आरोग्य खात्याचाच उपचार करण्याची वेळ आली आहे. बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे आरोग्य खाते रोगीट रुग्णांसारखे झाले आहे. आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य खात्याच्या त्या रोगावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा नासुर होण्यास वेळ लागणार नाही.


आरोग्य खात्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांबरोबर कायम शासकीय सेवेत असलेले कर्मचारी दहशतीखाली आहेत. आरोग्य खात्यात सर्वत्र शांतता असली तरी ही वादळापुर्वीचा शांतता आहे. सर्वच कर्मचारी चिडीचूप आहेत. दबक्या आवाजात हळूच चर्चा करत आहेत.दुसऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर खरा गुन्हा दाखल झाल्याने धाबे दणाणले आहेत. दहशतीखाली व पीडित कर्मचारी मनातून आनंद व्यक्त  करत आहेत. एकमेकांना स्मितहास्य करत बरं झाले,अति तेथे माती होतेच अशा म्हणींचा उच्चार करत आहेत.