Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. राखी माने नरडीचा घोट घेणार म्हणे.......परंतु कुणाचा?

शहर आरोग्य अधिकाऱ्यांना शोभत नाहीय

स्वतःचुकीच्या पद्धतीने नेमणूकीस अन् दंडेलशाही सुरू

उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांच्या डोक्यावर पडलेत का?

सोलापूर : दि.०६ (एमडी२४न्यूज)  सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.राखी सुहास माने आणि जिल्हा रुग्णालयातील विजयमाला बेले यांच्या विरोधात अदाखल पत्र गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा रुग्णालयातील महिला कंत्राटी कर्मचाऱ्याने सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नोंद झालेल्या माहितीनुसार डॉ राखी सुहास माने आणि विजयमाला बेले यांनी ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालयातील महिला कंत्राटी कर्मचाऱ्यास दमदाटी देत,तुझ्या नरडीचा घोट घेणार असे वादग्रस्त विधान केले आहे. आमच्या खूप ओळखी आहेत,तुला कामावरून काढून टाकेन अशा धमक्या दिल्या आहेत. मागील तीन महिन्यांपासून महिला कंत्राटी कर्मचाऱ्याला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून अखेर त्या महिला कर्मचाऱ्याने सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मागील तीन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात दबक्या आवाजात एक चर्चा सुरू होती,अखेर ही चर्चा बाहेर आली आणि अदाखल पत्र गुन्हा दाखल झाला.

सोलापूरच्या शहर आरोग्य अधिकाऱ्याने जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यास अशा प्रकारची धमकी देणे पहिलीच घटना आहे. सोलापूरातील आणि राज्यातील नागरिकांना एक मोठा प्रश्न पडला आहे,शहर आरोग्य अधिकाऱ्याचे जिल्हा ग्रामीण रुग्णालयात काय काम होते?,ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजात ढवळाढवळ करण्याचा अधिकार डॉ.राखी माने यांना कोण दिला?, जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे चारित्र्य तपासण्याचे अधिकार शहर आरोग्य अधिकारी डॉ.राखी माने यांना कोण दिले?, महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या नरडीचा घोट घेणाच्या अधिकार कोण दिले?, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. आरोग्य खात्याचे उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी डोक्यावर घेतल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला की काय? असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत. उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार पती-पत्नीच्या सर्व चुकांवर कानाडोळा करतायत म्हणून यांची दंडेलशाही सुरू झाली का असे प्रश्न पडले आहेत.

डॉ.राखी सुहास माने यांची शासनाने सोलापूरच्या शहर आरोग्य अधिकारीपदी चुकीची नेमणूक केली आहे. सोलापूर शहर आरोग्य अधिकारी पदी नेमणूक करताना एमबीबीएस एमडी-पीएसएम शिक्षणाची आवश्यकता असताना,डॉ.राखी माने (MBBS-ENT) यांची नेमणूक  केली आहे. डॉ.राखी सुहास माने या स्वतः चुकीच्या पद्धतीने सोलापूरच्या MOH पदावर विराजमान झाल्या आहेत. या बाबी सोलापूरकरांच्या अनेकवेळा निदर्शनास आणून दिल्या,प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या,आरोग्य खत्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या,तरीही सर्वजण मूग गिळून गप्प आहेत. आता त्या शहर आरोग्य अधिकारी डॉ.राखी माने  ग्रामीण रुग्णालयातील महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या नरडीचा घोट घेत जीवावर उठल्या आहेत. आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर महिला कंत्राटी कर्मचाऱ्याचा जीव वाचवणार का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.