Ticker

6/recent/ticker-posts

सायकलीसाठी लायसन्य( परवाना) .....


वाचून आश्चर्य वाटले असेल ना

जुन्या पिढीतील लोकांना "सायकल परवाना" म्हणजेच लायसन्स हा प्रकार नक्कीच अद्याप आठवणीत असणार आहे. साधारण १९०० साली इंग्रजांनी भारतातील काही भागांमध्ये परवान्याची सुरूवात केली. वाचून आपणास हसू येईल.


हे परवाने कोणाला? तर सायकलस्वारांना (त्या काळी सायकलींची संख्या जास्त होती), बैलगाड्यांना व टांग्यांना हे परवाने पितळी प्लेट मध्ये असत व त्यावर परवाना क्रमांक,सन व गावाचे / शहराचे नाव लिहिलेले असे. सदरहू परवाने नगरपालिका,ग्रामपंचायत किंवा तहसीलदार यांच्याकडून मिळत. हे पितळी बिल्ले म्हणजेच परवाने सायकलच्या हॅन्डलच्या मध्यभागी असणार्या पट्टीत स्क्रुने कायमस्वरूपी लावले जात. बैलगाड्रयांना किंवा टांग्यांना मात्र गाडीच्या पुढील भागात खिळ्याने ठोकले जाई. हे पितळी परवाने जर वरील उल्लेख केलेल्या वाहनांना लावले नाही तर पोलीस कर्मचारी त्या व्यक्तीकडून दोन ते सहा अण्ण्याचा दंड आकारत.


खालील पहिल्या प्रकाशचित्रातील परवाना हा १९६४ सालचा असून पुणे शहराचा आहे म्हणून त्यावर पु.म.पा.म्हणजेच पुणे महानगर पालिका असे लिहिलेले आहे. दुसरा परवाना हा पंजाबमधील "तोशाम" या गावातील आहे.