सोलापूरच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक पटलावर इमाने-इतबारे स्वच्छ प्रतिमेचं अंग अशी ओळख असलेली सोलापुरी पत्रकारिता www.berkya.com या वेब साईटच्या बातमीमुळं संशयाच्या धुक्यात आली. एक,दोन नाही तर तीन भले (?) पत्रकार बेरक्याच्या निशाण्यावर होते. ज्यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेची नाडी घट्ट करण्यासाठी पोलिसांकडं धाव घेतली. या त्रिमूर्तींच्या तक्रारीनुसार ' बेरक्या ' सुनिल ढेपे याच्याविरूध्द गुन्हा (अदखलपात्र) दाखल झालाय.
२२ मार्च २०२५ रोजी बेरक्या नारद या वेब पोर्टलवर ०३ पत्रकारांविरोधात खंडणीची बातमी प्रसारित करण्यात झाली. या बातमीनं सोलापुरातील पत्रकारितेच्या क्षेत्रात खळबळ माजली होती. पत्रकारिता आणि खंडणी ही न जुळणारी समीकरणं जुळविण्याचं काम त्या बातमीनं केलं होतं.
त्या आडून प्रसारमाध्यमातील मोठ्या बॅनरची प्रतिष्ठा डावावर लागली होती. प्रथम पत्रकार आणि त्यावर कढी म्हणून खंडणीच्या आरोपामुळं अशा धर्म संकटात आलेल्या पत्रकारांनी ' बेरक्या ' विरुद्ध पोलिसांकडं धाव घेतली. पत्रकारितेला पोलीस ठाण्याची पायरी तशी रूळलेली वाट ... ! ज्या वाटेने पत्रकार म्हणवणारा माणूस बातमीसाठी जाण्याऐवजी बेरक्याविरुध्द तक्रार घेऊन गेला.
बेरक्या नारद ने प्रसारित केलेल्या बातमीत पत्रकारितेतील तीन बहुचर्चित चेहरे खंडणीशी जोडले होते. ज्यांनी तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या तांदूळ माफियाकडून साडे तीन लाखाची खंडणी उकळली, घेणाऱ्यापेक्षा देणारा चार पाऊलं पुढचा निघाल्याने खंडणीची ती रक्कम परत केल्याचंही www.berkya.com नं प्रसारित केलं होतं. अशा प्रकारे खळबळ माजविणारा बेरक्या नारद स्वतः या अदखलपात्र गुन्ह्याच्या मालिकेने त्याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उभा केलाय.
मधील पत्रकारांवर शिंतोडे उडविणाऱ्या बेरक्या उर्फ नारदवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार आली, ती एनसी म्हणजेच अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आली. सदर बाजार पोलीस ठाण्यानंतर आता फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता बेरक्या उर्फ नारदने खळबळजनक बातमी वेबसाईटवर प्रकाशित केली होती. तीन पत्रकारांनी साडेतीन लाख रुपयांची खंडणी घेतली आणि नाक घासून परत केली या मथळ्याखाली बातमी प्रसारित केली होती. बेरक्याच्या या बातमी विरोधात एकानंतर एक तीन पत्रकारांनी www.berkya.com चे सुनिल ढेपे विरूध्द तक्रारी दाखल केल्या.
बेरक्याकडे पुरावेच नव्हते तर त्याने बातमी प्रसारित करत खळबळ उडविली,आता बेरक्या उर्फ नारद विरोधात अदखलपत्र गुन्हा जरी दाखल असला तरी, त्याचा तपास मात्र वेगाने सुरू आहे. बेरक्याच्या स्वाभिमानावर आलेलं प्रकरण आता मार्गी लावावे लागेल. मूग गिळून गप्प बसलेल्या बेरक्याला 'बाप दाखव नाही, तर श्राद्ध घाल' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बेरक्याला अडचणीतून बाहेर पडायचे असेल किंवा विश्वासाहर्ता टिकवायची तर खंडणी घेत असलेला किंवा खंडणीची रक्कम परत देतानाचा व्हिडीओ स्वतःहून प्रसारित करणे क्रमप्राप्त ठरतंय. कारण बेरक्याच्या स्वाभिमानावर आलंय. बेरक्याला स्वतःच्या इज्जतीची राखण करायची असेल तर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करणं क्रमप्राप्त ठरणार आहे, असं जाणकारांचं मत आहे.
बेरक्या उर्फ नारदने दुसऱ्या दिवशी एक पाऊल मागे ठेवत बातमीत बदल केला. बातमीत बदल केल्याने माध्यम क्षेत्रात रंगतदार चर्चा सुरू आहे रणछोडदास बेरक्याने रणभूमीवर युद्ध करण्याऐवजी जणू लोटांगण घेतल्याचा प्रत्यय आला होता.
बेरक्याला पराक्रम गाजवायचा असेल तर त्याला युद्ध करावेच लागेल, प्रश्न अब्रूचा असतो. तांदळाचा काळा बाजार, रॉकेल माफिया, हे शब्द स्थानिक पत्रकारितेला नवे नाहीत, त्यासोबत खंडणी हा मुद्दा आहे. या प्रकरणाचा छडा लावायचा तर तपास अधिकारी किती खोलवर सूर मारतात, त्यावर अवलंबून असणार आहे.