Ticker

6/recent/ticker-posts

“एक जिल्हा एक नोंदणी” योजना १ मे पासून कार्यान्वित


सोलापूर : दि.०६ (एमडी२४न्यूज)  राज्य शासनाच्या "एक जिल्हा,एक नोंदणी" या नव्या योजनेची अंमलबजावणी सोलापूर जिल्ह्यात दि.०१ मे २०२५ पासून सुरू झाली आहे. या योजनेनुसार जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक  कार्यालयांचे दस्तऐवज नोंदणीचे कार्यक्षेत्र आता सामायिक करण्यात आले आहे.
                   
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील मिळकतीच्या दस्त नोंदणीसाठी त्याच तालुक्यातील नोंदणी कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करणे अनिवार्य नाही. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील मिळकतीच्या दस्ताची नोंदणी कोणत्याही तालुक्यातील नोंदणी कार्यालयात करता येईल.
           
जिल्ह्यातील जास्तीत नागरीकांनी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सह जिल्हा निबंधक ( वर्ग १ ) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी,पी.जी. खोमणे यांनी केले आहे.