Ticker

6/recent/ticker-posts

शेती वादातून महिलेस गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या...


शेती वादातून महिलेस गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न – जिल्हा सत्र न्यायालय,सोलापूर येथून ३ आरोपींना सशर्त जामीन मंजूर

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथे दि- ०६ मार्च २०२५ रोजी शेतीच्या वादातून श्राविका चंद्रकांत पवार (रा. रानमसले) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. 
          
या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. १४२/२०२५ नोंद करण्यात आला असून विनायक महालिंग गरड, गणेश महालिंग गरड,महादेवी महालिंग गरड,बापुराव दादाराव गरड व लक्ष्मी बापुराव गरड (सर्व रा.रानमसले,ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्या आपल्या शेतात ट्रॅक्टर लावून कुळवणी करत होत्या. यावेळी गावातील विनोद गरड यांच्या ट्रॅक्टरने कुळवणी सुरू असताना शेजारील विनायक गरड याने मोबाईलवरून विनोदला धमकी दिली की, "श्राविकाची शेती कुळवू नको, आमचा वाद आहे". नंतर काही वेळातच विनायक गरड, गणेश गरड,महादेवी गरड यांनी बापुराव गरड यांच्या शेतातून धाव घेत शिवीगाळ करत फिर्यादीकडे येत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

आरोपींनी शेतीविवादाच्या कारणावरून फिर्यादीस वाद घालून शिवीगाळ केली, लाथाबुक्यांनी,पट्याने व चाकूने मारहाण केली. फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेत,नायलॉनच्या दोरीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत कलम १०९, ११९(१), ११८(१), ३२३, १८९(२),१९१(२), १९३(३), १९०, ३५२, ३५१(२) व १२६(२) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
       
सदर आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालय,सोलापूर येथे जामीन अर्ज दाखल केला होता. जिल्हा सत्र  न्यायाधीश जे.जे.मोहिते यांनी यातील ३ आरोपी नामे विनायक महालिंग गरड,महादेवी महालिंग गरड आणि लक्ष्मी बापुराव गरड यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. 

या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड.कृष्णा मूषण,ॲड.वैभव बोंगे व ॲड. ओंकार फडतरे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲड. गंगाधर रामपुरे यांनी बाजू मांडली.