सोलापूर : दि.०८ (एमडी२४न्यूज) सावित्रीबाई फुले विद्यापीठात १४० सुरक्षा रक्षकरची पदे साधारणपणे रूपये २२ हजार मासिक वेतनावर तातडीने भरावयाचे आहेत. जिल्हयातील पात्र व इच्छुक माजी सैनिकांनी दिनांक १३ मे २०२५ पुर्वी जिल्हा सैनिक कार्यालयात नावे नोंदवावीत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केले आहे.
या पदासाठी माजी सैनिक वयाने ५५ वर्षे वयापेक्षा कमी असावा. जिल्हयातील पात्र व इच्छूक माजी सैनिक यांनी सदर संधीचा फायदा घ्यावा. तसेच आणखी एका मुख्य नियोक्त्याकडून जून अखेर पर्यत ९० सुरक्षा रक्षकांची भरती करण्याची मागणी येण्याची शक्यता असल्याचेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तुंगार यांनी कळविले आहे.