Ticker

6/recent/ticker-posts

एनटीपीसी चे महाप्रबंधक बीजेसी शास्त्री यांनी प्राणी संग्रहालयाची केली पाहणी



सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी NTPC थर्मल प्लांटला भेट प्रसंगी देगाव येथील ७५ एम एल डी मलनिसारण केंद्र व महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे सी.एस आर फ़ंड मधून मदत करण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्या अनुषंगाने बुधवार ०७ मे रोजी  NTPC चे महाप्रबंधक बीजेसी शास्त्री कार्यकारी संचालक यांनी महात्मा गांधी प्राणी संग्रालयाची पाहणी केली. यावेळी डॉ.सतीश चौगुले यांनी संपूर्ण माहिती दिली. 

यावेळी NTPC चे मनोरंजन सारंगी,रफिक उल इस्लाम,अमित सिंग,सहायक आयुक्त गिरीष पंडित,नगर अभियंता सारिका आकूलवार,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. NTPC चे महाप्रबंधक बीजेसी शास्त्री यांनी महापालिका येथे आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे याची भेट घेतली यावेळी महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे NTPC थर्मल पवार च्या सी.एस.आर. फ़ंड मधून सहकार्य करू असे आश्वासन दिले.