Ticker

6/recent/ticker-posts

दुसऱ्या महायुध्दातील लाभार्थ्यांनी ३० जूनपर्यंत हयातीचे दाखले जमा करावेत


सोलापूर : दि.०८ (एमडी२४न्यूज) जिल्ह्यातील दुसऱ्या महायूध्द लाभार्थ्यांनी शसानाच्या प्रचिलीत नियमानुसार आपले हयातीचे दाखले जमा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील दुसरे महायुध्द लाभार्थ्यांनी आपले हयातीचे दाखले जिल्हा सैनिक कार्याल्यामध्ये प्रत्यक्ष अथवा पोस्टाने दि. ३० जून २०२५ पर्यंत जमा करावेत. तसेच हयातीचे दाखल्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र व बँक पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत जोडावी. ज्या लाभार्थींचे हयातीचे दाखले दिलेल्या मुदतीत कार्यालयास प्राप्त होणार नाहीत त्यांचे अनुदान माहे जून २०२५ पासुन बंद करण्यात येईल व हयातीचे दाखले प्राप्त झालेनंतर फरकासह अनुदान देण्यात येईल. 

जिल्ह्यातील दुसरे महायूध्द लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले हयातीचे  दाखले जमा करावेत. तसेच ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.  अशा लाभार्थ्यांच्या मृत्यूचा दाखला अर्जासहित त्यांच्याअवलंबितांनी  जमा करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केले आहे.