Ticker

6/recent/ticker-posts

अल्पसंख्य समाजातील अनेकांचा शिवसेनेत प्रवेश


उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापुरातील अल्पसंख्य समाजातील अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

सोलापूर :  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल येथील 'मुक्तागिरी' शासकीय निवासस्थानी पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सुदर्शना रमेश त्रिगुणाईत,सोलापूर लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील अल्पसंख्य समाजातील अनेक युवा शिवसेनेत प्रवेश केला.

शुक्रवारी रात्री मुंबईत शासकीय निवासस्थानी,उपमुख्यमंत्री शिंदे यांनी,शिवसेनेत प्रवेशोत्सुक कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांचं शिवसेना चा केशरी शेला घालून या सर्वांचं शिवसेनेत स्वागत केलं. 

यात सोलापूर शहरातील अल्पसंख्याक समाजातील युवा सुहेल शेख,मोईन शेख अन् त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत असलेले मुजफ्फर शेख, फरहान पटेल,आदिल पटेल, शाहरुख शेख,लुईस कोरे,अबरार शेख,आकिब सय्यद, आवेज सय्यद,मोहसीन शेख,रियाज नदाफ,अभी मेसे,नदीम नदाफ यांच्यासह अनेकजण शिवसेना शिंदे गटात प्रवेश केले.

राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. पावसाळा संपण्यापूर्वीच ही 'रण' धुमाळी रंगणार आहे. शिंदे सेनेत नव्यानं पक्ष प्रवेश केलेले सर्व 'चेहरे' सोलापुरातील पूर्व विभाग आणि शहर मध्य भागातील असून बहुसंख्येने अल्पसंख्य समाजातून पुढं आलेले आहेत.