Ticker

6/recent/ticker-posts

स्केटिंग क्लबतर्फे 82 व्या स्केटिंग शिबिरादरम्यान मातृदिनाप्रित्यर्थ...


चेतक रोलर स्केटिंग क्लबतर्फे 82 व्या स्केटिंग शिबिरादरम्यान मातृदिनाप्रित्यर्थ...
           
सोलापूर : चेतक रोलर स्केटिंग क्लबकरिता, दिव्यकांत गांधी. चेतक क्लबतर्फे जागतिक मातृदिनानिमित्त,स्केटिंग करणाऱ्या मुलाचे बोट धरून पळण्याच्या आईच्या स्पर्धा:
चेतक रोलर स्केटिंग क्लबद्वारा 33 व्या वर्षी, 82 वे स्केटिंग शिबीर यंदा पासपोर्ट ऑफिससमोर,होम मैदानालगत रोडवर घेण्यात आले.

शिबिरादरम्यान प्रत्येक वर्षी मातांना विशेष आनंद मिळावा ,या हेतूने जागतिक मातृदिन विविधतेने साजरा करण्यात आले. यंदा मातृदिन दिनांक 11 मे 2025 रोजी खाऊ वाटप केले व 18 मे रोजी सकाळी शिबिराच्या जागेवर जागतिक मातृदिनानिमित्त स्केटिंग करणाऱ्या मुलाचे बोट धरून पळण्याच्या आईच्या स्पर्धा सहभाग झाले होते.

स्पर्धा एकंदर 300 मीटर पळण्याची होती. कार्यक्रमाचा प्रारंभ,आईच्या उदात्त भावनांना प्रणाम करून करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या आईचे नाव : (कंसामध्ये – चेतक शिबिरातील ज्या पाल्यासोबत आई पळाली त्या पाल्याचे नाव)  पहिला क्रमांक: कल्पना (श्रावण माशाळ), व अपूर्वा - बहीण (अक्षरा मेरगु)  दुसरा क्रमांक : अश्विनी ( समर्थ सारंगमठ) तिसरा क्रमांक : अनिता ( आनंद स्वामी) चौथा क्रमांक : नसरीन ( जाकी शेख) पाचवा क्रमांक : यास्मिन (अदनान शेख) व उत्तेजनार्थ : सपना ( आलेक्या सनम) , अर्चना ( समर्थ काशेट्टी ), मरियम ( खादिजा शेख), फिरदोस ( मोहम्मद साद शेख), अक्सर (आहद शेख), प्रियंका ( करूनेश दांती), वर्षारानी ( कृष्णा धाराशिवकर), नेहा ( वंश शहा).

बक्षीस वितरण समारंभामध्ये सर्व विजेत्यांना क्रमवार स्मृती चिन्ह देण्यात आले.
बच्चो के लिये कुछ भी – स्पर्धेमध्ये आईनी स्केटिंग करणाऱ्या मुलाची गती जुळवून घेऊन मुलाबरोबर पळत होते. या पळण्याच्या शर्यतीत आईने आपली शक्ती झोकून दिली व आंतरिक क्षमता व ममता दाखवून दिली. समस्त आईंनी कार्यक्रमाचे समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये दिव्यकांत गांधीसह,मयूर सोलनकर,जयदेव बाहेरमठ यांनी स्पर्धा परीक्षणाचे कार्य केले.