मुंबई : दि.२२ (प्रतिनिधी) राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांना राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी रवींद्र ठाकरे,प्रकाश इंदलकर व गजानन निमदेव यांना देखील राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.
बेरक्या नारद विरोधात सोलापुरात एफआयआर दाखल; बेरक्या अडचणीत
सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे यांनी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच इतर माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तसेच समारोप राष्ट्रगीताने झाला. शपथविधी सोहळ्याला विधान परिषद सदस्य परिणय फुके,मुख्य सचिव सुजाता सौनिक,प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.