Ticker

6/recent/ticker-posts

बेरक्यावर दुसरी एफआयआर दाखल;बेरक्या तुझ्या स्वाभिमानावर आलंय

मूग गिळून गप्प का? बातमीत बदल करणे बेरक्याची मोठी घोडचूक

सोलापूर मधील पत्रकारांवर शिंतोडे उडविणाऱ्या बेरक्या उर्फ नारदवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दुसरी एनसी म्हणजेच अदाखलपत्र फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्यानंतर आता फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता बेरक्या उर्फ नारदने खळबळजनक बातमी वेबसाईटवर प्रकाशित केली होती. तीन पत्रकारांनी साडेतीन लाख रुपयांची खंडणी घेतली आणि नाक घासून परत केली या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. बेरक्याच्या या बातमी विरोधात अभिषेक राजेंद्र अदेप्पा या पत्रकाराने फिर्याद दिली आहे.


बेरक्याकडे पुरावेच नव्हते तर त्याने बातमी प्रकाशित करत अंगावर का घेतले असा प्रश्न पडला आहे. बेरक्या उर्फ नारद विरोधात अदाखलपत्र गुन्हा जरी दाखल असला तरी,त्याचा तपास मात्र वेगाने सुरू आहे हा..... स्वाभिमानावर आलेलं प्रकरण आता बेरक्याला मार्गी लावावे लागेल. मूग गिळून गप्प बसलेल्या बेरक्याला बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

२२ मार्च २०५ रोजी बेरक्या नारद या वेब पोर्टलवर ०३ पत्रकारांविरोधात खंडणीची बातमी प्रसारित करण्यात आली होती. या बातमीनं सोलापुरातील पत्रकारितेच्या पटलावर खळबळ माजली होती. पत्रकारिता आणि खंडणी ची बातमी प्रसारित करीत खळबळ माजविणारा बेरक्या नारद स्वतः या अदखलपात्र गुन्ह्यात भलताच अडचणीत आल्याचं दिसतंय. 





बेरक्याला अडचणीतून बाहेर पडायचे असेल किंवा विश्वासाहर्ता टिकवायची तर खंडणी घेत असलेला किंवा खंडणीची रक्कम परत देतानाचा व्हिडीओ स्वतःहून प्रसारित करणे क्रमप्राप्त ठरतंय. कारण बेरक्याच्या स्वाभिमानावर आलंय. बेरक्याला स्वतःच्या इज्जतीची राखण करायची असेल तर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रकाशित करावा.

बेरक्या उर्फ नारदने दुसऱ्या दिवशी एक पाऊल मागे ठेवत बातमीत बदल केला. बातमीत बदल केल्याने माध्यम क्षेत्रात रंगतदार चर्चा सुरू आहे रणछोडदास बेरक्याने रणभूमीवर थांबून युद्ध करण्याऐवजी शेपूट घातली. बेरक्याला पराक्रम गाजवायचा असेल तर त्याला युद्ध करावेच लागेल. युटर्न मारून ट्रॅकवर गाडी आली तरच बेरक्याचा स्वाभिमान टिकेल.