Ticker

6/recent/ticker-posts

दहावी विदयार्थ्यांना एस.के.फौंडेशनतर्फै शैक्षणिक साहित्य भेट

रोशन प्रशालेत दहावी विदयार्थ्यांना एस.के.फौंडेशनतर्फै शैक्षणिक साहित्य भेट

सोलापूर :  एस.के.फाऊंडेशन व लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल यांचे संयुक्त विदयमाने रोशन प्रशाला अक्कलकोट रोड,सोलापुर येथे अँड.आकाश आयंची यांचे वाढदिवसा निमित्त इयत्ता दहावी विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य लेखन पॅड,पेन आणि डेअरी मिल्क चाॅकलेट भेट दिले. या कार्यक्रमांस एस.के.फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड.श्रीनिवास कटकूर यांचे अध्यक्षतेखाली,सचिव यशवंत इंदापुरे,  अँड.आकाश आयंची,लायन्स क्लब सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष लायन.चक्रधर अन्नलदास,सचिव लायन.केदार स्वन्ने, ला.चंद्रकांत यादव,रोशन प्रशालेचे मुख्याध्यापक बी.जे. इंगळगी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. प्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे बुके देऊन प्रशालेचे वतीने सत्कार करण्यांत आले. 

यावेळी एस.के.फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड.श्रीनिवास कटकूर यांनी मार्गदर्शनपर भाषणांत सध्याच्या स्पर्धेच्या युगात जीव ओतुन अभ्यास केले शिवाय पर्याय नाही. चांगले मार्क मिळविले तरच चांगल्या काॅलेजमध्ये प्रवेश मिळेल असे सांगितले. सचिव यशवंत इंदापुरे यांनी जिद्द,चिकाटी आणि मेहनत घेतल्यास यश नक्की मिळते. स्वत:च्या आवडीच्या क्षेत्रात पुढील शिक्षण घेतले असता पुढील कॅरीअर चांगले बनू शकते हे उदाहरणासह पटवून दिले. व लायन चंद्रकांत यादव व लायन चक्रधर अन्नलदास यांनी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचे महत्व पटवून दिले  तर अँड.आकाश आयंची यांनी दहावी च्या परीक्षेसाठी विदयार्थ्यांना  शुभेच्छा दिले. सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दहावीत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी लेखन पॅड,पेन या शैक्षणिक साहित्याचा वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील मराठी व उर्दू विभागाचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.आभार इंगळगी यांनी मांनले.