सोलापूरची विमानसेवा सुरू न झाल्याबद्दल सोलापूरकर संतप्त - गाजर आंदोलन करून व्यक्त केला निषेध
हे खरोखरच जुमलेबाज सरकार आहे का? सोलापूर विकास मंचचा संतप्त सवाल
सोलापूर: दि.३० (एमडी२४न्यूज) सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी,या करीता सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य सोलापूरकरांनी चार वर्षांचा प्रदीर्घ लढा दिला.विमानसेवेतील प्रमुख अडथळे दूर करूनही दीड वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. विमानतळाचे नूतनीकरण होऊन चार महिने झाले असले, तरीही नागरी विमानसेवा सुरू झालेली नाही. २३ डिसेंबर २०२४ पासून होटगी रोड विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होईल, असे खुद्द केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री श्री मुरलीधरजी मोहोळ यांनी सोलापूरात येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात २३ डिसेंबर रोजी विमानसेवा सुरू झाली नाही,हे वास्तव आहे.
विमानसेवा सुरू न होण्यामागे हास्यास्पद कारणे दिली जात आहेत. त्यामुळे सोलापूर विकास मंचने शासन व प्रशासनाविरोधात पुन्हा एकदा यल्गार पुकारला आहे. याचाच पहिला भाग म्हणून ३० डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या पुनम गेटसमोर एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय पातळीवरील मंत्र्याने २३ डिसेंबर २०२४ पासून विमानसेवा सुरू होईल, अशी घोषणा केली आणि प्रत्यक्षात ती सुरू न झाल्याने, ही घोषणा म्हणजे विधानसभा निवडणुकीतील स्टंट होता का, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
त्याचप्रमाणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबतही असेच प्रकार घडले आहेत. २०१६ साली सोलापूरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर झाले होते. मात्र, आठ वर्षे लोटूनही हे महाविद्यालय अस्तित्वात आलेले नाही. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणोशेट्टी आणि आमदार प्रणितीताई शिंदे यांनी प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंच मोठा लढा उभारणार आहे.
सोलापूरकरांची सातत्याने उपेक्षा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी, विमानसेवा सुरू न झाल्यास गड्डा यात्रा संपल्यानंतर प्रदीर्घ लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
आंदोलनात मान्यवरांची उपस्थिती - आंदोलनात सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डी. राम रेड्डी, इंजि. मिलिंद भोसले, केतन शहा, विजय जाधव, योगिन गुर्जर, सुहास भोसले, आनंद पाटील, दत्तात्रय अंबुरे, सुशील कुमार व्यास, इकबाल हुंडेकरी, नरेंद्र भोसले, हर्षल कोठारी, प्रसन्ना नाझरे, काशिनाथ भतगुणकी, अर्जुन रामगिर, सुभाष वैकुंटे, बिराजदार राजू, अशोक अहुजा, संजय वाकडे, गौरी अंबेकर, विनय वडगावकर, शुभदा पाटील, भरत पाटील, किसन रिकेबी, आरती अरगडे, अमृता अकलूजकर, नर्सिंग मेंगजी, शैलेंद्र क्षीरसागर, प्रशांत भोसले, कुंडल राकेश, घनश्याम डायमा, नागेश काकी, अमित कामतकर, श्रीकांत अंजुटगी, श्रीनिवास पोटाबत्ती, लक्ष्मीकांत दंडी, बाळासाहेब मोरे, सुनील दस्सल, शशिकांत बनसोडे, प्रभाकर कमटम, परवेज पिरजादे, रवींद्र कोळी, महेश चिंचोळे, राजकुमार राठोड, अब्दुल शेख यांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्योगपती सुरवसे परिवाराचे प्रभा सुरवसे, विजय सुरवसे, अनुराधा सुरवसे, शैला सुरवसे, सुमन सुरवसे, श्वेता सुरवसे, राखी सुरवसे, सुमन लोखंडे, युवराज सुरवसे, विनोद क्षीरसागर, सरताप काझी, नीलकंठ उंबरजगीकर, सतीश दारूकर, विनोद सिद्धम, मनोज कुमार तमिवार, शेखर बंगाळे, मोसिन शेख, संतोष कसे, बनसोडे कोहीरकर, रोहन झटकर यांचीही या आंदोलनात उपस्थिती होती.
याशिवाय,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी विजय कुंदन जाधव यांना फोनद्वारे संपर्क साधून महाराष्ट्रातील सर्व व्यापारी सोलापूरकरांच्या या लढ्यात त्यांच्यासमवेत असल्याची ग्वाही दिली.
मुरलीधर मोहोळ यांच्या स्विय्य सह्यायका समवेत चर्चा आणि पुढील आश्वासने - आंदोलनादरम्यान सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले आणि विजय कुंदन जाधव यांनी केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्वीय सहायक विनोद सातव यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. सोलापूरकरांचा तीव्र संताप मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्यात आला. लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल, असे आश्वासन देण्यात आले. सोलापूरकरांच्या विकासासाठी सोलापूर विकास मंचने पुकारलेल्या या लढ्याला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.
