Ticker

6/recent/ticker-posts

लोकांची लोकशाही वाचविण्यासाठी लोकांना...

बॅलेट पेपर आणा,लोकशाही वाचवा यंत्र हटवा,देश वाचवा

प्रिय सुजान भारतीय नागरिकांनो,१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि १९५२ ला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्यात. भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. जगातील आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकासारख्या देशात सुद्धा आजही या आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न देशात-निवडणुका या आजही बॅलेट पेपरवरच घेतल्या जातात. तिथे ईव्हीएम किंवा कुठल्याही कम्प्युटराईज्ड यंत्रावर निवडणुका घेतल्या जात नाहीत. जगात सायबर क्राईम हा आजचा ज्वलंत विषय आहे. संगणकीकृत कुठल्याही यंत्रात छेडछाड करून स्वतःला हवे तसे बदल करण्याचा प्रयत्न जगात आजपर्यंत हजारो वेळा झालाय. ईव्हीएम किंवा कुठलेही आधुनिक यंत्र याला अपवाद नाही. 


संविधानिक लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकमताला अनन्यसाधारण महत्व आहे. नव्हे लोकमताशिवाय लोकशाही व्यवस्थेला शून्य किंमत आहे. 





आपल्या भारतीय संविधानाची सुरुवातच  "आम्ही भारताचे लोक" अशी आहे. याचा अर्थ असा आहे की,भारतीय लोकशाही व्यवस्थेत भारताचे लोक म्हणजे भारताची जनता ही सर्वोच्च आणि सार्वभौम आहे. लोकमताचा आदर म्हणजे संविधानाचा आदर करण्यासारखेच आहे. भारताच्या जनतेला म्हणजे भारताच्या लोकांनी वेळोवेळी जनांदोलनाच्या माध्यमातून आपले म्हणणे आणि न्याय्य मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. परंतु लोकमताचा आदर न करता वेळोवेळी लोकविरुद्ध सरकारने लोकआंदोलन दडपून काढले आहे. ईव्हीएम हटाव ही लोकांची मागणी आहे. कुठलीही सरकारी यंत्रणा लोकमताचा अनादर कुठल्याही परिस्थितीत करू शकत नाही. आपल्या संविधानिक लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण करण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकार आहे. आणि हा लोकाधिकार कुठलेच सरकार किंवा कुठलीच सरकारी यंत्रणा दडपून टाकू शकत नाही. गेल्या १० वर्षात देशातील प्रत्येक राज्यातून आणि केंद्रशासित प्रदेशातून ईव्हीएम विरोधात आंदोलन झाली आहेत.




भारतीय नागरिकांना आता कुठल्याही परिस्थितीत ईव्हीएम नकोय. कारण हे ईव्हीएम लोकांचा आवाज दडपण्याचा क्रूर प्रयत्न करत आहे. ईव्हीएममुळे लोकशाही नष्ट होत असेल तर अशी केवळ मूठभर लोकांचे, भांडवलंदारांचे सरंक्षण करणारी आणि करोडो भारतीयांचे शोषण करणारी भांडवली लोकशाही नकोय तर लोकांच्या मताचा, लोकहिताचा आणि लोकशाहीचे संरक्षण करणारी लोकशाही आम्हाला हवी आहे. म्हणून आम्हाला बॅलेट पेपरवरील निवडणुका हव्यात. ईव्हीएम किंवा कुठल्याही आधुनिक यंत्रावरील निवडणुका नकोत. म्हणून लोकशाहीच्या भवितव्यासाठी बॅलेट पेपरवरील निवडणूक हव्या आहेत. म्हणून बॅलेट पेपर आणा लोकशाही वाचवा असे आपण प्रत्येकाने म्हटले पाहिजे.

सौजन्य - माजी.न्यायमूर्ती,बी.जी.कोळसे पाटील,माजी न्यायमूर्ती.बॅलेट पेपर आणा,लोकशाही वाचवा कृती समिती