Ticker

6/recent/ticker-posts

इनामदार यांना "गुणगौरव पुरस्काराने" सन्मानित


पुणे : दि.१४ (प्रतिनिधी) मानवतावादी समाज सेवा संघटना,पुणे यांच्यावतीने "गुणगौरव पुरस्कार" सन २०२४ ते २०२५  देऊन अंजुम इनामदार,अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच सन्मानित करण्यात आले.



महाराष्ट्र राज्य शिक्षण खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन दिनांक १४ ऑक्टोबर १९९४ रोजी "मानवतावादी समाजसेवा संघटनेची" स्थापना केली. त्यानंतर संघटनेचे काम पाहून शासनाच्या विविध खात्यात काम करणारे अधिकारी,कर्मचारी,यांच्या बरोबरच लेखापाल, व्यापारी,डॉक्टर, वकील,कलाकार,इंजिनीयर,शिक्षक,संस्था चालक विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक या संघटनेत काम करतात विशेषतः या संघटनेचा काम संपूर्ण महाराष्ट्रात असून विविध सामाजिक उपक्रम संघटनेच्या माध्यमातून सतत सुरू असतो. 

कोरोना काळात आमची संघटना मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या माध्यमातून केले गेलेल्या कामाचा "गुणगौरव पुरस्कार" सन २०२४ ते २०२५ असा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. मानवतावादी समाज सेवा संघटनाचे अंजुम इनामदार यांनी एमडी२४न्यूजशी बोलताना संघटनाचे जाहीर आभार केले.