सोलापूर : दि.२५ (एमडी24न्यूज) स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त इंद्रभवन येथे दिनांक 24 ते 27 जून दरम्यान आयोजित छायाचित्र व पेंटिंग प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उदघाटन खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते तर आमदार सुभाष देशमुख प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रदर्शनात एकूण 13 चित्रकारांनी सहभाग नोंदवला आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी कला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन दि. 27 जून 2023 पर्यंत इंद्र भवन येथे सुरू असून यासाठी सोलापूर शहरातील नागरिकांनी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनात शिल्प,चित्र व छायाचित्रे - "सोलापूर शहर व संस्कृती" या विषयावर हे प्रदर्शन भरवले आहे. यात सोलापुरातील जुने वाडे,मंदिर,कामगारांचे चाळ, धार्मिक उत्सव,सिद्धेश्वर यात्रेचे छायाचित्र व चित्र तयार पहाता येणार आहेत. या प्रदर्शनात सोलापूरच्या संस्कृतीचे दर्शन घडत आहे. या प्रदर्शनात डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या छायाचित्रांचे स्वतंत्र दालन उभे करण्यात आले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज,शहीद अशोक कामटे,शहीद राहुल शिंदे,कवी रा.ना.पवार,डॉ.निर्मलकुमार फडकुले यांचे शिल्प या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत.
यावेळी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी,सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड,स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे,मुख्य लेखापाल रूपाली कोळी,आर्किटेक शशिकांत चिंचोळकर,प्रदीप जोशी,युवराज गाडेकर,राहुल कुलकर्णी,सुनिता हिबारे तसेच चित्रकार विठ्ठल मोरे,देवेंद्र निम्बर्गीकर,प्रवीण रणदिवे,मल्लिकार्जुन सालिमठ,सचिन गायकवाड,पौर्णिमा शहरवाले, धनराज काळे,मयूर हिंगणेकर अंजली स्वामी,वर्षा बाकळे,छायाचित्रकार यशवंत सादुल, शिल्पकार अमरनाथ कणकी,नितीन जाधव आदी उपस्थित होते.
