सोलापूर : दि.१० (प्रतिनिधी) सोलापूर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून यावर्षी गणेश उत्सव सुरळीत व शांती पूर्वक पार पडले त्याबद्दल महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी शहरवासीयांचे आभार मानले.दहा दिवसाच्या गणेश उत्सवा नंतर अनंत चतुर्थीचे देखील विशेष असे नियोजन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये 12 विसर्जन कुंड तयार करण्यात आले होते. या ठिकाणी सोलापूर शहरातील एकूण 55 हजार 740 गणेश मूर्तीचे विसर्जन कुंड या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. त्याचबरोबर तीन फुटापेक्षा जास्त उंच असलेले गणपती मंडळाकडून अशा 84 मूर्ती संकलित करण्यात आले.
शहरातील मंडळानी व नागरिकांनी तुळजापूर रोडवरील खाणीत 3 फुटा पेक्षा मोठे 302 गणेश मूर्ती आणण्यात आले होते. त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेश भक्तांनी वाजत गाजत गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आले. महापालिकेच्या वतीने संकलन करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे विधीवत विसर्जन तुळजापूर रोडवरील दोन खाणीत व इतर विसर्जन कुंडात आदरपूर्वक करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसह अधिकारी उपलब्ध करण्यात आले होते.त्या ठिकाणी कर्मचारी व अधिकारी हे आज दुपारी 2:30 वाजेपर्यंत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचं काम सुरू होते.तसेच मूर्ती संकलन केंद्र व विसर्जन कुंड या सर्व ठिकाणीहून 47 टन निर्मल्य जमा करण्यात आले.यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक गणेश विसर्जन झाल्यामुळे यापुढेही पुढच्या वर्षी जास्तीत जास्त नागरिकांनी शाडूची गणेश मूर्ती किंवा मातीची गणेश मूर्ती स्थापन करून घरातच विसर्जन करावे.
सोलापूर शहरातील घरगुती गणेश विसर्जन ज्यांनी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन घरीच केले आहे. त्यांचा तसेच शहरातील मोठे मंडळ ज्यांनी तुळजापूर रोड खाण येथे गणपती आणून दिले आहे. तसेच महापालिकेचे दिवस आणि रात्र अधिकारी व कर्मचारी यांनी काम केलेले आहे अशा सर्वांचे व महापालिकेच्या आवाहनाला सोलापूर शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल व गणेश विसर्जनासाठी महापालिकेला ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे अशा सर्वांचे आभार आज आयुक्त पी.शिवशंकर यांनी मानले.
तुळजापूर रोडवरील खाण येथे अशी केली नेटकी व्यवस्था !
तुळजापूर रोडवरील खाणीमध्ये संकलित केलेल्या मुर्त्यांचे विसर्जन करण्याकरिता महापालिकेच्या वतीने नेटकी व्यवस्था करण्यात आली. महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी शुक्रवारी याठिकाणी बराच वेळ तळ ठोकून उपस्थित होते. खाण्याच्या परिसरात आलेल्या मोठ्या गणपतीचे विसर्जन आयुक्त पि. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजा करून खाणीत विसर्जन करण्यात आले. तुळजापूर रोडवरील या खाण परिसरात लाईटची व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी महापालिकेचे 30 कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पथक दोन शिफ्ट मध्ये तैनात राहणार आहेत. सुमारे सात अभियंतेही उपस्थित होते. सकाळी 9 ते 5 व सायंकाळी 5 ते रात्री 12 पर्यंत या दोन शिफ्ट मध्ये कर्मचारी कार्यरत आहेत. दोन क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. आत आणि बाहेर जाण्याकरिता दोन मार्ग ठेवले आहेत. पोलीस व महापालिका पथकासाठी मंच तयार करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी 70 गाड्या तैनात आहेत तसेच महापालिकेचे 600 कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचबरोबर मक्तेदाराकडून 400 कामगार उपलब्ध करून घेण्यात आले आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.