Ticker

6/recent/ticker-posts

सिव्हिलमध्ये अत्याधुनिक मशनरीज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करू शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चिवटे यांची ग्वाही


सोलापूर : दि.११ (प्रतिनिधी)  सोलापूर येथील सिव्हिल  हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या अत्याधुनिक मशनरीज  उपलब्ध होण्यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या माध्यमातून निश्चितपणे  प्रयत्न करू, अशी ग्वाही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्याचे सर्वेसर्वा तथा मुख्यमंत्र्याचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी दिली. 

रविवारी,चिवटे हे सोलापुरात आले असता सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे,परिवहनचे माजी सभापती तुकाराम मस्के,सोलापूर शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मनीष काळजे,माजी नगरसेवक मनोज शेजवाळ,उमेश गायकवाड,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख हरिभाऊ चौगुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते चिवटे यांचा सत्कार करण्यात आला. 


चिवटे पुढे म्हणाले,सरकारने आतापर्यंत वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध ठिकाणी 1हजार मोफत शिबिरे घेतली आहेत. गेल्या पाच वर्षात दोन लाख चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे. कोविड काळात सोलापूरलादेखील पाचशे  ऑक्सिजन बेड तातडीने उपलब्ध करुन देण्यात आले होते. आतादेखील सरकार आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातूनही राज्यातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. गंभीर आजार आणि शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत करण्यात येत असून किडनी, लिव्हर यासारख्या अनेक आजारांच्या रुग्णांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे काम सरकार करीत आहे.तसेच रक्त व प्लाजमा उपलब्ध व्हावा यासाठी वैद्यकीय कक्ष प्रयत्नशील आहे. 

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून आरोग्य केंद्रांचे काम चालू आहे. महात्मा फुले योजना किंवा आयुष्यमान भारत योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांना आवश्यक ते उपचार कसे उपलब्ध होतील,यासाठी आपला प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात धर्मादाय हॉस्पिटल असलेल्या ठिकाणी राज्यातील ज्यांच्याकडे केशरी व पिवळी शिधापत्रिका आहे अशा गरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत उपचार उपलब्ध व्हावेत,म्हणून आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री,धर्मादाय आयुक्त आणि संबंधित हॉस्पिटलचे सीईओ यांची मुंबईत बैठक लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केरळा महापौर आल्यानंतर त्या वेळी महाराष्ट्र सरकारच्यावतीने तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे पंधरा दिवस मुक्काम करून या भागातील नागरिकांना मदत केल्याची आठवणही त्यांनी करून दिली. भविष्यामध्ये  करमाळ्यात गरजू रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर चालू करण्याचा आपला मानस असल्याचेही ते म्हणाले. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष किरण बनसोडे यांनी केले.