Ticker

6/recent/ticker-posts

...माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करा -जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाचे आवाहन

सोलापूर : दि.२४ (प्रतिनिधी)  जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा पत्नी/पाल्य यांना विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबदद्ल एकरकमी 10 हजार आणि 25 हजार रूपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी 10 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, येथे अर्ज सादर करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.



राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य,संगीत, गायन,वादन,नृत्य इ.क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे,पूर जळीत/दरोडा/अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक,पत्नी,पाल्य इ.यांना व सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी,12 वीमध्ये 90 टक्केपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी,पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. आयआयटी,एचआयएम, एआयआयएमएस अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सोलापूर यांच्याकडे 10 सप्टेंबर 2022 पूर्वी अर्ज करावेत.

विशेष गौरव पुरस्कारासाठी आवश्यक असणारा विहीत नमुन्याचा अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे उपलब्ध आहेत,संबंधितांनी कार्यालयाशी विनाविलंब संपर्क साधून अर्ज सादर करावेत.

आवश्यक कागदपत्रे - वैयक्तिक अर्ज, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध (डी.डी 40) विहित नमुना अर्ज, पाल्य शिकत असलेबाबतचा बोनाफाईड दाखला, मार्कलिस्टची सांक्षाकित प्रत, माजी सैनिक/विधवेच्या ओळखपत्राची छायांकित प्रत, डिसचार्ज बुकमधील फॅमिली डिटेलच्या पानाची झेरॉक्स प्रत, बँक पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्ड छायांकित प्रत आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र.

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2022 असून त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे (दुरध्वनी क्रमांक 0217-2731035) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.