सोलापूर : दि.२४ (प्रतिनिधी) कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संबंधी प्रमाणपत्र/पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी महाराष्ट्र शासनाची मान्यता व महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची संलग्नता नसलेल्या संस्था,अनधिकृत संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये,असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज बीडकर यांनी केले आहे.
अशा संस्थांच्या भूलथापांना, त्यांच्या खोट्या दाव्यांना व जाहिरातींना पालक व विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. संस्था व अभ्यासक्रमांची मान्यता शासनाच्या किंवा मंडळाच्या अधिकृत https://msbsd.edu.in संकेतस्थळांवर तपासून खात्री करूनच प्रवेश घ्यावा. अभ्यासक्रमांसाठी राज्यातील संस्था व अभ्यासक्रम मान्यतेबाबत व अनधिकृत संस्थांच्या तक्रारीबाबत मंडळ, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अथवा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, डफरीन चौक सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बीडकर यांनी केले आहे.
