Ticker

6/recent/ticker-posts

... खोट्या बातम्या पसरवण्या विषयी सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आली तक्रार


सोलापूर : दि.२७ (प्रतिनिधी) सोलापूरातील विविध नामांकित दैनिकांत न्यायप्रविष्ट असलेल्या विषयाची अत्यंत खोटी बातमी प्रकाशित करुन सोलापूरच्या लोकांना तसेच संबंधित यंत्रणांची दिशाभुल करणारी बातमी प्रकाशित केली. धर्मराज काडादी हे सोलापूरातील दैनिक संचार चे संपादक असून ते सोलापूरातील प्रतिष्ठीत संस्था श्री. सिद्धेश्वर मंदिर देवस्थान, संगमेश्वर शिक्षण संस्था, श्री.सिध्देश्वर सह साखर कारखाना इत्यादी विविध संस्थांवर अध्यक्षपदी विराजमान असून, सोलापूरच्या मिडिया क्षेत्रात त्यांची दहशत आहे. दैनिक संचारच्या माध्यमातून सोलापूरांना नेहमीच भ्रमित करणाऱ्या खोट्या प्रशोभक आणि अशोभनीय भाषेत बातम्या ते प्रसिद्ध करत असतात.




गुरुवार दिनांक : २५ अॉगस्ट २०२२ रोजी दैनिक संचारचे संपादक धर्मराज काडादी यांनी बुधवार दिनांक : २४ अॉगस्ट २०२२ रोजी सोलापूरातील विविध नामांकित दैनिकांत श्री.सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अनधिकृत बेकायदेशीर चिमणी बाबतीत काही मजकूर प्रसिद्ध झाला आहे. यात प्रामुख्याने डि.जी.सी.ए.यांनी सोलापुरात येऊन सिद्धेश्वर कारखान्याचे सहवीज निर्मीती प्रकल्पाची अनधिकृत व बेकायदेशीर चिमणीची पाहणी केली त्या संबंधात अत्यंत चुकीची माहिती छापली आहे. चिमणी पाडली तरी होटगी रोड विमानतळावरुन नागरी विमानसेवा अशक्य असल्याचे म्हटले आहे.

वास्तविक कारखाना व्यवस्थापनाने डि.जी.सी.ए.कडे आपले म्हणणे सादर करायला मुदतवाढ मागितली होती आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार डि.जी.सी.ए.ने आपला पाहणी अहवाल हा हायकोर्टात सादर करण्यासाठी सांगितले आहे. तर तो अहवाल कारखाना व्यवस्थापनाकडे कसा आला? याचा शोध संबंधित पत्रकाराने लावायला हवा होता किंवा अहवालाची मागणी करायला हवी होती.कारखाना व्यस्थापन म्हणते इतर अडथळे आहेत ते महानगर पालिका व डि.जी.सी.ए. पाहून घेईल. त्यांनी फक्त त्यांच्या ७ वर्षा पासून बेकायदेशीर कोणत्याही खात्याची परवानगी न घेता ९० मीटर उंचीच्या चिमणी संबधी बोलावे एन.टि.पी.सी. यांनी २००८ सालीच परवानगी घेतलेली आहे.

सोलापूरच्या ४८ लाख लोकांच्या विकासाच्या प्रश्न इतक्या उथळपणे आणि बेजबाबदारपणे कसा हाताळतात? सोलापूर विकास मंच मार्फत आम्ही समस्त सोलापुरातील सर्व सामान्य नागरिकांना आवाहन केले की,डि.जी.सी.ए.ने आपला पाहणी अहवाल कोर्टात सादर केला आहे. तो मनपा आयुक्तांकडे येईल,मग आयुक्त त्यावर उचीत निर्णय घेऊन पत्रकारांना तशी अधिकृत माहिती देतील. मनपा आयुक्त अधिकृत माहिती देईपर्यंत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.तसेच डि.जी.सी.ए. ही विमानसेवा सुरू करणारी संस्था नसून प्रवासाच्या जीवास कोणता धोका नाही ही पाहणारी संस्था असून विमान सेवा सुरू करणाच्या अधिकार हा एअरपोर्ट औथोरिटी ऑफ इंडिया ह्या संस्थे चा असून, डि.जी.सी.ए.यांचा काही संबंध नाही, असा खुलासा सोलापूर विकास मंचने केला आहे.