Ticker

6/recent/ticker-posts

...काडादी खोट्या आणि सोलापूरकरांच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरविले आहेत - थोबडे


सोलापूर : दि.२६ (प्रतिनिधी)  सिद्धेश्वर कारखाने बांधलेल्या बेकायदेशीर चिमणी प्रकरणी सुनावणी सुरू आहे. डीजीसीए यांनी आठ आठवड्यात तपासणी करून सिद्धेश्वर कारखान्याच्या बेकादेशीर चिमणी बाबत आदेश करावा असा आदेश माननीय हाय कोर्टाने दिला होता. शिवाय महापालिका आयुक्तांनी देखील याची सुनावणी करून परत आदेश करण्याचे आदेश दिले होते. असे असताना सिद्धेश्वर कारखाने त्यांचे सर्व युक्तीवाद फोल ठरल्यावर पुन्हा डीजीसीए कडून मुदत वाढ मागून घेतली आहे. आता 31 ऑगस्ट पर्यंत सिद्धेश्वर कारखाना आपले म्हणणे सादर करणार आहे. याबाबत डीजीसीएचे रॉय आणि संजय थोबडे यांच्याशी बोलणे देखील झाले आहे. 





कारखान्याकडे डीजीसीएचा कोणताच अहवाल नसताना कारखान्याच्या चिमणी बरोबरच एनटीपीसीची चिमणी देखील विमानसेवेच्या फनेल झोन मध्ये येते असा खोटारडा आरोप करून धर्मराज काडादी यांनी चिमणी वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही दैनिकांना त्यांनी मुद्दामून चुकीच्या बातम्या दिल्या. नोएडा मधील 33 मजली इमारत सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवून ती 28 ऑगस्ट रोजी पाडण्याचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध विकासांचा अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडावी आणि सोलापूरची विमानसेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी वारंवार संजय थोबडे यांनी केली आहे. शिवाय सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून हायकोर्टात देखील कॅवहेट दाखल करत असून त्यावर लवकरच आमच्या बाजूने निकाल लागेल असा विश्वास थोबडे यांनी व्यक्त केला. 

काडादी यांनी  खोट्या आणि सोलापूरकरांच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरविले आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. यापूर्वी देखील सिद्धेश्वर कारखाना विमानसेवा सुरू करणार आहे. असे खोटे वक्तव्य त्यांनी केले होते. सोलापूरकरांनी विकासाला अडथळा ठरणाऱ्या डॅंबीस आणी ४२० जो २०१६ पासुनच ७५०० गळीताची परवानगी असल्याचे लेखापरिक्षण अहवालात धादांत खोटे छापत असलेल्या,धर्मराज काडादी यांच्यावर विश्वास ठेवू नका असे देखील थोबडे यांनी म्हटले आहे.