Ticker

6/recent/ticker-posts

कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मिळवून देण्यासाठी प्रत्नशील - आमदार कल्याणशेट्टी

अक्कलकोट : दि.१६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना राजस्थान, छत्तीसड,झारखंड या राज्यांप्रमाणे जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी आगामी पावसाळी अधिवेनादरम्यान पाठपुरावा करण्याची मागणी अक्कलकोट तालुका जुनी पेंशन संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अक्कलकोट विधानसभा मतदासंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे लेखी निवदनाद्वारे केली.यावेळी संघटनेचा सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जुनी पेन्शनच्या चळवळ ही व्यापक जनआंदोलन बनली असून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार मार्फत प्रयत्नशील राहून पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी केले.


यावेळी संघटनेच्या माध्यमातून 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त मयत कर्मचारी कुटुंबीयांची होणारी आर्थिक परवड थांबवून तत्काळ जुनी पेंशन लागू करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.प्रलंबित अनुकंपा प्रस्ताव तातडीने मंजूर करून मयत कर्मचारी वारसांना तातडीने विनाअट सेवेत सामावून घ्यावे,मयत कर्मचारी यांचे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत प्रलंबित सानुग्रह अनुदान मान्यतेचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी संघटनेच्या वतीने प्रकर्षाने करण्यात आली.सर्वच प्रश्नांबाबत मा.ना.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,मा.ना.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितल्याची  माहिती तालुकाध्यक्ष राजेंद्र सू्र्यवंशी यांनी दिली. 

यावेळी शिक्षक नेते राजशेखर उंबरानीकर,तालुकाध्यक्ष राजेंद्र सू्र्यवंशी,राजशेखर करपे, सैदप्पा कोळी,राजेंद्र मोहोळकर,ज्ञानेश्वर केंद्रे,मनोज कदम, सुधाकर मुळजे, राहुल गोविंदे,महांतेश भंडारकवठे,संतोष चिंचोळीकर,सिद्धाराम चौधरी,विक्रम जाधव,समीर कुलकर्णी,दादाराव भोंग, शरणय्या स्वामी,नीलकंठ मायनाळे,अशोक राठोड,सिद्धाराम जमादार, ईरप्पा अनगिरे,प्रकाश कोळी आणि मोठ्या संख्येने पेंशन शिलेदार उपस्थित होते.

फोटो ओळ - अक्कलकोट - महाराष्ट्र राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना राजस्थान, छत्तीसड,झारखंड या राज्यांप्रमाणे जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी आगामी पावसाळी अधिवेनादरम्यान पाठपुरावा करण्याची मागणी अक्कलकोट तालुका जुनी पेंशन संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अक्कलकोट विधानसभा मतदासंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे लेखी निवदनाद्वारे केली.