सोलापूर : दि.१६ (प्रतिनिधी) अनियंत्रित महागाई, वाढती प्रचंड बेरोजगारी,महिलांवरील अत्याचार हे देशाच्या विकासातील प्रमुख अडसर असून यामुळे याचा सगळ्यात जास्त फटका घरगुती महिलांना बसत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.केंद्र सरकार केवळ योजनांची जाहिरात करत असून अंमलबजावणी ही कागदावर आहे. इव्हेंट राबविणाऱ्या सरकारला गरिबांचे संकट दिसत नाही का? असा सवाल अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी केल्या.
मंगळवारी 16 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने सोलापूरातून वाढती महागाई,बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार,व्यसनाधीनतेच्या विरोधात 25 हजार लेखी सह्यांचे निवेदन भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना पोस्टाद्वारे पाठवण्यात आले असून महाराष्ट्रातुन 1 कोटी सह्यांचे निवेदन सादर करणार असून महामहिम राष्ट्रपती यांनी हस्तक्षेप करून महागाई नियंत्रणात न आल्यास महिला संघटना रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेवंता देशमुख, सचिव शकुंतला पानिभाते,कोषाध्यक्ष सुनंदा बल्ला,लिंगव्वा सोलापुरे,गीता वासम,तबसुम शेख आदी उपस्थित होते.
