सोलापूर : दि.११ (प्रतिनिधी) सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी संवाद मेळाव्यात संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष पदी सोमनाथ राऊत यांचे एकमताने निवड करण्यात आली.
यावेळेस संभाजी ब्रिगेडचे सोलापूर संपर्कप्रमुख अभिमन्यू पवार पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे प्रदेश सह संघटक मनोज गायकवाड केंद्रीय कार्यकारणी सदस्य दिनेश जगदाळे मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सदाशिव पवार जिल्हा सचिव लक्ष्मण महाडिक व हनुमंत पवार व संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हाध्यक्ष शिवश्री सोमनाथ राऊत यांचा सत्कार प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
