संभाजी ब्रिगेड चा दणका.
सिद्धेश्वर फाउंडेशन आणि जामगुंडी परिवाराच्या वतीने जुळे सोलापूर येथील जामगुंडी मंगल कार्यालय (जामगुंडी लॉन्स) येथे भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ (भागवत सप्ताह) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात आनंदशास्त्री मुळे गोंदीकर महाराजांनी काल जुळे सोलापूर मध्ये जामगुंडी मंगल कार्यालयात भागवत सप्ताह चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आणि समर्थ रामदास अणि शिवाजी महाराज यांची उभ्या आयुष्यात कधीच भेट झाली नसताना आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा तसा आदेश असतानाही अनंत शास्त्री मुळे गोंदीकर महाराज यांनी त्यांची भेट झाली आणि शिवाजी महाराजांनी समर्थांची माफी माफी मागितली असे उद्गार काढले होते.
त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जामगुंडी मंगल कार्यासमोर अनंत शास्त्री मुळे गोंदकर या कीर्तनकार च्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करण्याचा इशारा दिला असता विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे संबंधित आयोजकांनी दिलगिरी व्यक्त करून अनंत शास्त्री मुळे महाराज हे तमाम शिवभक्ताची माफी मागतील असे सांगितले व तसा व्हिडिओ संभाजी ब्रिगेड व पोलीस स्टेशनला पाठवतो असे कबूल करून माफी मागितली.
