माझा मागील चाळीस वर्षांचा काळ हा माझ्या कार्य तत्परतेची साक्ष आहे. तुमचा 'ज्ञानयात्री' म्हणून मी नेहमीच आपल्या सर्वांच्या हक्कांसाठी आणि प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहिलो आहे. हा केवळ माझा प्रवास नाही, तर आपल्या सर्वांचा एकत्रित प्रवास आहे. येत्या निवडणुकीत मला आपल्या सर्वांच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे.
माझ्या उमेदवारीला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल परिषदेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, परिवाराचे आणि शिक्षक बांधवांचे मनःपूर्वक आभार!
मला पसंती क्रमांक १ चे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा, ही माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. आपला, प्रा.डॉ.बब्रुवाहन पांडुरंग रोंगे, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ
