Ticker

6/recent/ticker-posts

पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!


सोलापूर : महाराष्ट्र पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक आचारसंहिता 2026 च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाची विशेष कारवाई,मौजे अनकढाळ गावच्या हददीत मिरज ते सोलापूर महामार्गावरील टोलनाक्याजवळ अनकढाळ ता.सांगोला जि. सोलापूर अवैध बनावट देशी व परराज्यातील विदेशी मद्य, वाहतुकी विरुद्ध कारवाई करून1आरोपी अटक,1 कंटेनरसह जप्त करत सुमारे 84 लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई,डॉ.राजेश देशमुख,विभागीय उपायुक्त,सागर धोमकर पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क सोलापूर भाग्यश्री पं.जाधव व तउपअधीक्षक,सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले यांनी  कारवाई केली.

या कारवाईमध्ये एक टाटा कंपनीचा 6 चाकी कंटेनर वाहन क्र.एनएल 01 एई 6823 त्यामध्ये एकुण बनावट देशी मद्य 90 मिली क्षमतेचे 1071 बॉक्स एकुण 107100 बाटल्या त्याची एकुण किंमत 42,84,000/- व परराज्यातील विदेशी मद्य 180 मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग व्हीस्कीचे 12 बॉक्स त्याची एकुण किंमत 1,55,520/- एक मोबाईल तसेच कंटेनर यांची एकुण मुददेमाल किंमत 84,09,520/- मिळून आला आहे.



सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पंकज कुंभार पंढरपूर विभाग,दुय्यम निरीक्षक,सौरभ भोसले,समाधान शेळके,राम निंबाळकर,बापू चव्हाण,श्रध्दा गडदे तसेच जवान  विजय शेळके,विनायक वाळुंजकर,तानाजी जाधव,गजानन जाधव,ए.बी.दशवंत,योगेश पाटील,प्रविण पुसावळे,देविदास चौधरी,संजय पराडे जवान नि.वाहन चालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली असुन सदर गुन्हयाचा तपास सौरभ भोसले दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,पंढरपूर क्र. 2 हे करीत आहेत.

अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,सोलापूर यांनी या निमित्ताने अवैध व्यावसायिकांना कडक शब्दात इशारा दिला आहे की, "जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध मद्य धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. ग्रामीण आणि शहरी भागात गस्त वाढवण्यात आली असून,यापुढेही अशीच कडक कारवाई सातत्याने सुरू राहील. जे लोक या अवैध व्यवसायात आढळतील, त्यांच्यावर अजामीनपात्र कलमान्वये गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर पावले उचलली जातील." आपल्या परिसरात कोठेही अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असल्यास त्याची माहिती तत्काळ विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर कळवावी,माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल,असे भाग्यश्री पं.जाधव,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,सोलापुर यांनी आवाहन केले आहे.