पुणे पदवीधर,शिक्षक मतदारसंघासाठी शनिवारीही नामनिर्देशन पत्र स्वीकारणार-विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकरिता उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर अशी आहे; येत्या शनिवारी (३ ऑक्टोबर रोजी) प्रशासकीय सुट्टी असली तरी उमेदवारांकडून सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतली जाणार आहेत.
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली आहे.
