Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जैन संघटनेच्या महिला विभागातर्फे ‘गुरुदक्षिणा’ उपक्रम; सहा शिक्षकांचा सत्कार


सोलापूर : भारतीय जैन संघटना (BJS), जिल्हा महिला विभाग सोलापूरच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त ‘गुरुदक्षिणा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘मूल्यवर्धन’ विषयाचे प्रशिक्षण देणाऱ्या सहा प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष केतन शहा यांच्या हस्ते साक्षांत वाघमारे,किशोर झेंडेक,दत्ता यादव,संतोष जावळे, सुवर्णा कटारे आणि कल्पना चव्हाण या प्रशिक्षकांचा शाल, मोतीमाळ, पुष्पगुच्छ व पेन देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्कारमूर्ती शिक्षकांनी प्रशिक्षणादरम्यान आलेले विविध अनुभव तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धन घडवून आणताना आलेल्या सकारात्मक अनुभवांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमात राज्याध्यक्ष केतन शहा यांनी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून राज्यभर सुरू असलेल्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. शिक्षकांचे समाज घडविण्यातील योगदान महत्त्वपूर्ण असून, मूल्याधिष्ठित शिक्षणातून सक्षम पिढी घडविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास राज्याध्यक्ष केतन शहा,राज्य सचिव संतोष बंब,महिला जिल्हाध्यक्ष प्रवीणा सोलंकी,अशोकजी भालेराव, सचिव निर्मला मेहता,संतोष लोणावत,वैशाली शहा,प्रशांत वर्धमानेसर यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला मेहता यांनी केले,तर आभार प्रदर्शन वैशाली शहा यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त आयोजित या ‘गुरुदक्षिणा’ उपक्रमातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.