Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर कॅन्सर सोसायटीच्या सचिवपदी डॉ.मंठाळे यांची एकमताने निवड


सोलापूर : सोलापूर शहरात सन १९८० पासून सातत्याने कॅन्सरविरोधी जनजागृती व सामाजिक कार्य करणाऱ्या सोलापूर कॅन्सर सोसायटी या सेवाभावी धर्मादाय संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेचे कार्य आणि आगामी उपक्रमांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

ही सभा अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेशजी निऱ्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संस्थेचे माजी सचिव डॉ.शिरीष कुमठेकर यांनी मागील वर्षातील संस्थेच्या कार्याचा अहवाल सभेसमोर सादर केला. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.





कॅन्सरचे वाढते प्रमाण,त्याबाबतची जनजागृती,प्रतिबंधात्मक उपाय तसेच नागरिकांनी आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी यासाठी सोलापूर कॅन्सर सोसायटी सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

दरम्यान,सभेमध्ये संस्थेच्या नूतन सचिवपदी डॉ. संजय मंठाळे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे उपस्थित सदस्यांनी स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.





या वार्षिक सर्वसाधारण सभेस संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. देखणे, खजिनदार उत्तम डोईजोडे,आजीव सदस्य डॉ.सरिता कोठाडिया,डॉ. रोहिणी देशपांडे,केतन शहा,डॉ.योगेश बंग, बिराजदार,डॉ.स्मिता बूब यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कॅन्सरविरोधी जनजागृतीचे कार्य अधिक व्यापक करून समाजातील नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक संदेश पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.